Posts

Showing posts from April, 2025

G D Birla Badminton at Bombay Gymkhana

Image
G D Birla Badminton at Bombay Gymkhana Mumbai, 3rd April 2024 : The 31st edition of the GD Birla Memorial Masters Inter-Club Badminton Tournament will be played at the Bombay Gymkhana from April 4-6 and 8-12. Regarded as the premier veteran badminton tournament in the circuit, the event continues to grow in prestige, drawing top veteran players from across several districts. The event, promoted by Badminton Gurukul, has garnered over 20 teams and more than 150 individual entries, reinforcing its reputation as a marquee competition for veteran players. "We at Badminton 45 are very happy to present the 31st edition of the GD Birla Badminton Tournament," said Ayaz Bilawala, Organizing Secretary. "As an addition to the bouquet of events we already offer to the veteran circuit, this tournament has now become the most sought-after event, thanks to the active veteran badminton community. It is a privilege to have Bombay Gymkhana co-host the event, and we have witnessed the tou...

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारे 'एप्रिल मे ९९'चे धमाकेदार गाणे प्रदर्शित

मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने केले ‘ताकुंबा’ साँग लाँच उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारे 'एप्रिल मे ९९'चे धमाकेदार गाणे प्रदर्शित परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ! उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या रंगतदार वातावरणात ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’  हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर मुले टेन्शन फ्री असतात आणि मग त्यांचे आवडीचे दिवस सुरु होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत उनाडपणा, खेळ, गावभर फिरणे या सगळ्या नॉस्टॅलजीक क्षणांचा अनुभव या गाण्यातून मिळणार आहे. आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या धमाल, मस्ती आणि एनर्जीने भरलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून त्यांचाच जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुस्कर व गीतकार प्रशांत...

गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित...

गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा टीझर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल! गौतमी पाटीलच्या “कृष्ण मुरारी” गाण्याचा Ghibli स्टाईल फोटो व्हायरल आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. नुकतंच तिने या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझरमध्ये ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचसोबत नव्या ट्रेंडमधील (Ghibli) स्टाईल पोस्टरं तिच्या चाहत्यांनी बनवले आहे.  “कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे. सूत्रांच्या मते, हे गाणं ५...

सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा'

सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला 'बंजारा परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे 'बंजारा' हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे.  यापूर्वी 'बंजारा' चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटले असेल. हे पडद्यावर जितके सहज, सुंदर दिसत असले तरी या ठिकाणी चित्रीकरण करणे, हे प्रचंड आव्हानात्मक होते. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे.  दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, '' हे एक असे चित्...

'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'देवमाणूस' चित्रपटातील हे भक्तीगीत संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे आहे.  सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी लिहिलेले 'पांडुरंग' हे गाणे श्रद्धा आणि भक्तीच्या प्रवासाला समर्पित करणारे आहे. महेश मांजरेकर यांची वारी यात्रेतील दृश्ये या गाण्यात पाहायला मिळत असून, ती त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक प्रवासाचे दर्शन घडवणारी आहेत.  या गाण्याच्या अनुभवाबद्दल सोनू निगम म्हणतात, ‘’पांडुरंग हे माझे पहिले वारी गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होण्याचा आनंद मला आहे. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टु...

रहस्यमय 'जारण' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

विवाहिता आणि बाहुली, काय आहे यामागील गूढ? रहस्यमय 'जारण' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ! ६ जूनला होणार प्रदर्शित ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे सुद्धा सध्या तरी एक रहस्यच आहे.  मोशन पोस्टरमध्ये एका विवाहितेच्या हातात बाहुली दिसत असून तिला टाचण्या टोचलेल्या आहेत. सोबतच पार्श्वभूमीला ऐकू येणाऱ्या रोमांचक संगीतामुळे हे मोशन पोस्टर थरारक अनुभवही देत आहे. यावरून हा चित्रपट जादूटोण्यावर आधारित तर नसेल? असा प्रश्न जर प्रेक्षकांना पडला, तर हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात," 'हा एक कौटुंबिक भयपट आहे. करणी, जारण यासारख्या गोष्टींमुळे एका कुटुंबाला सहन करायला लागण...

'अवकारीका' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Image
' अवकारीका '   चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित स्वच्छता दूताच्या   भूमिकेत   अभिनेता विराट मडके कथा त्यांच्या आत्मसन्मानाची ,  कथा आपल्या आत्मभानाची , स्वच्छ ,  देखण्या ,  निरोगी भारताची ,  पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची...    अशा टॅगलाईनसह आलेल्या  ' अवकारीका '  चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड ,  अरविंद भोसले ,  मृणाल कानडे ,  गीता सिंग यांची आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध असला तरी समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी ,   स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून  ' अवकारीका ’  चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.    अभिने...