लोकप्रिय मराठी अभिनेत्री झी टीव्हीवरील ‘सरु’मध्ये मोहक मटकर साकारत आहे प्रमुख भूमिका

लोकप्रिय मराठी अभिनेत्री झी टीव्हीवरील ‘सरु’मध्ये मोहक मटकर साकारत आहे प्रमुख भूमिका – उच्च शिक्षणाच्या आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या एका छोट्‌या शहरातील मुलीची ही कथा आहे.

भारतात छोट्‌या छोट्‌या शहरातील अनेक स्वप्नाळू आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत असतात. शिक्षण, खेळ आणि कला हे त्यांच्या स्वप्नांसाठी दरवाजे उघडत असले तरी मोठ्‌या शहराचा हा प्रवास त्यांच्या चिकाटीची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आणतो. प्रेरणादायी आणि आपल्याशा वाटतील अशा कथा सांगण्याच्या आपल्या वारशासाठी मानली जाणारी झी टीव्ही ही वाहिनी अशीच एक कथा – ‘सरु’ – प्रस्तुत करत आहे. आपल्या छोट्‌या शहराच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या एका तरुण मुलीची ही रोचक कथा आहे.

सरस्वतीचे विश्व हे तिच्या गावातच वसलेले असून ही तिची आवडती जागा आहे. पण तिथे उच्च शिक्षणाची काही सोय नसल्यामुळे आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या ओळखीच्या गावातून अनोळखी मोठ्‌या शहरात येण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय उरत नाही. आणि यामध्ये सगळ्‌यात मोठा अडसर आहे तो म्हणजे तिच्या आईला ह्या गोष्टीसाठी मनवणे कारण तिच्या जाण्याला त्यांचा पूर्ण विरोध आहे.

हुशार मोहक मटकर यात सरस्वतीची मुख्य भूमिका साकारत असून ती बारकाईने काम करणारी, आत्मविश्वास असलेली आणि स्वतंत्र अशी तरुण मुलगी आहे, जी आपल्या मूल्यांसोबत जोडलेली आहे. राजस्थानच्या एका गावातील सरस्वती कबड्‌डी चॅम्पियन असून तिचे जिल्हा आयुक्त बनण्याचे स्वप्न आहे. ती नीतिमान, धाडसी असली तरीही संवेदनशील आहे. जर कोणी काही कारणास्तव तिच्याकडे बोट दाखवले तर ती मागे हटत नाही, अढळ विश्वासाने प्रतिक्रिया देते आणि तिचे म्हणणे ऐकून घेतले जाईल याची खात्री करुन घेते.

आपल्या भूमिकेबद्दल प्रमुख नायिका मोहक मटकर उत्साहाने म्हणाली, “हमारा परिवारसोबत गेले एक वर्षभर मी झी टीव्हीचा हिस्सा राहिलेली असून सरुसारख्या मालिकेसाठी प्रमुख भूमिका मिळाल्याबद्दल मी अतिशय उत्साहात आहे. जेव्हा मला ह्या मालिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा तर मी अक्षरशः चंद्रावरच पोहोचले होते. हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मॉक शूटपासून उदयपुरमधील आमच्या आऊटडोअर शूटपर्यंत मी अख्ख्या टीमसोबत प्रत्येक क्षणाची मजा लुटली आहे. आम्ही एकत्र येऊन आमच्या ओळींवर काम केले आणि मला ती प्रक्रिया अतिशय आवडली. आणि हा माझा आत्तापर्यंतचा सर्वांत सुंदर अनुभव आहे.”

ती पुढे म्हणाली, “एक सेल्फ–मेड स्त्री बनण्याचा निर्धार हे मला माझी व्यक्तिरेखा सरस्वतीबद्दल सगळ्‌यात जास्त आवडते. शिक्षणाप्रति तिची आवड, शिकण्याची इच्छा आणि यशस्वी होण्याची तिची आकांक्षा माझ्या मनाला भावली. त्यामुळेच तर ती मुंबईला येण्याचा प्रयत्न करत आहे – जेणेकरुन ती स्वतःसाठी अधिक चांगले भविष्य निर्माण करु शकेल. सरस्वती एक साधी पण महत्त्वाकांक्षी मुलगी असून तिला आपल्या मूळांशी जोडलेले राहून जगाचा शोध घ्यायचा आहे. मला माझ्या व्यक्तिरेखेचा लूकही अतिशय आवडला असून सर्वांनी तिची कथा उलगडताना पाहावी यासाठी मी उत्सुक आहे.”

काय सरस्वती आपल्या आईचे मन वळवू शकेल आणि उच्च शिक्षणासाठी आपल्या स्वप्नातील शहरामध्ये पाऊल टाकू शकेल?

शशी सुमीत प्रॉडक्शन्स प्रा.लि.निर्मित ‘सरु’ ही धैर्य, दृढनिश्चय आणि आत्मशोधाची कथा आहे.

पहा ‘सरु’चा प्रेरणादायी प्रवास उलगडताना लवकरच झी टीव्हीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025