छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा..

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटातील “सांग सांग भोलानाथ” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, बालपणातल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देताना मोठ्यांच्या हृदयात नव्याने आपली जागा निर्माण करतय!

या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, मजेशीर पण विचार करायला भाग पडणारे नवीन बोल लिहिलेत मनोज यादव यांनी, आणि आवाज दिलय आपल्या सर्वांचे लाडके, आवाजाचे जादूगार अवधूत गुप्ते यांनी. हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या मोबाईल, सोशल मीडिया आणि मनात repeat mode वर सुरु आहे!

अवधूत गुप्ते म्हणतात, “‘सांग सांग भोलानाथ’ हे बडबडगीत नुसतं गायचं नव्हतं तर त्याला एक सिनेमाच्या पात्रांसाठी जे वेगळं स्वरूप देण्यात आलं ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात खोलवर रुजवायचं होत , हे गाणं इतकं सर्व समावेशक आहे कि या लहान मुलांसोबत गाताना मी पण लहान झालो झालो होतो – एक आठवण, एक vibe, एक reconnecting moment होती माझ्यासाठी. अशी गाणी क्वचितच गायला मिळतात जे त्यां ची जुनीआठवण जपत नव्या स्वरूपात आपल्याला समोर सादर होतात."

दिग्दर्शक शिवराज वायचळ सांगतात, “‘भोलानाथ’ हे गाणं अगदी कथानक तयार करतानाच मनात होतं. बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या या गाण्याला नव्या पिढीसाठी सादर करणं हे आमचं स्वप्न होतं. गुलराजचं धमाल संगीत, मनोजचे अभ्यासू बोल आणि अवधूतचा जादूई आवाज – या तिघांनी मिळून या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे. मुलांनी त्यांचा व्हर्जन मनापासून एन्जॉय केलंय आणि आता पालक देखील या गाण्याचं हे टवटवीत नवं रूप नक्कीच एन्जॉय करतील.”

‘आता थांबायचं नाय’ चित्रपट हा संघर्ष, स्वप्नं, धैर्य आणि प्रेरणेची कहाणी सांगतो. भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांसारख्या दमदार कलाकारांनी या सत्यकथेवरुन प्रेरित असणाऱ्या चित्रपटाला अभिनयाचं सशक्त पाठबळ दिलय !

‘सांग सांग भोलानाथ आपल्या बच्चेकंपनी सोबत सुट्टीत एन्जॉय करा ,आपल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणींना उजाळा द्या आणि नव्या पिढीला एक नवीन गोष्ट सांगा ,आपल्या लहानग्यांसोबत नक्की या १ मे २०२५ रोजी, ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला !

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K