महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील नव्याने अद्ययावत केलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटल संचलित डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे उद्घाटन

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील नव्याने अद्ययावत केलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटल संचलित डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई / २९ एप्रिल २०२५ : महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज वडाळामुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल समूहाचा भाग असलेल्या या ९,००० चौरस फुटांतील सुधारित सुविधेमुळे महाराष्ट्रात प्रगत आणि सर्वांसाठी सुलभ नेत्रसेवा देण्याच्या समूहाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे.

आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे रूपांतर अत्याधुनिक सुविधेने करण्यात आले आहे. येथे आता सुसज्ज मॉड्युलर ऑपरेटिंग थिएटरजागतिक दर्जाचे लेसर रिफ्रॅक्टिव्ह ऑपरेशन थिएटरआधुनिक ऑप्टिकल रिटेल आणि डायग्नोस्टिक डिस्प्ले युनिटतसेच पूर्ण सुसज्ज इन-हाउस फार्मसी उपलब्ध आहे. सर्वसमावेशक आणि सुलभ नेत्रसेवेचा अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे.

मोतीबिंदूरेटिनाकॉर्नियालेसिकग्लॉकोमायुव्हीआयटिसस्क्विंटबाल नेत्ररोगन्यूरो-ऑप्थॅल्मोलॉजीॲडव्हान्स्ड आय ट्रॉमा सेंटरअक्युलर ऑन्कोलॉजी आणि ऑक्युलोप्लास्टी अशा विविध नेत्रविकारांवरील प्रगत उपचार येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

अचूक निदान आणि उपचारासाठी अत्याधुनिक नेत्रोपचार तंत्रज्ञानाची रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रेटिना आणि मोतीबिंदूच्या ॲडव्हान्स्ड शस्त्रक्रियांसाठी अल्कॉन कॉन्स्टिलेशन सर्जिकल युनिट आणि थ्रीडी आर्टेव्हो (3D ARTEVO) मायक्रोस्कोपहाय-स्पीड लेसिकसाठी वेव्हलाइट EX500, तसेच रेटिना आणि पोस्टेरियर कॅप्स्युलोटोमी उपचारांसाठी झाइस ग्रीन लेझर आणि वायएजी लेझर अशा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. निदान आणि इमेजिंगसाठी निडेक (NIDEK) मिरांतेझाइस OCT 5000, पेंटाकॅमझाइस आयओएल मास्टर आणि बी-स्कॅन यांसारखी उपकरणे वापरण्यात येताततर इनडायरेक्ट ऑप्थाल्मोस्कोप आणि अप्लॅनेशन टोनोमीटरसारख्या साधनांमुळे क्लिनिकल तपासणी अधिक प्रभावी झाली आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि जागतिक दर्जाची नेत्रसेवा रुग्णांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, "डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल नेटवर्कचा एक भाग असलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे अत्याधुनिक केंद्र म्हणून झालेले रूपांतर पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे. 'रुग्ण प्रथमया तत्त्वाला आधार देत वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केलातर आरोग्यसेवा किती उंचावू शकतेयाचे हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात नेत्रोपचारांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत जागतिक दर्जाची नेत्रसेवा पोहोचवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो."

डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल म्हणाले, "डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आमचा प्रवास गेल्या काही वर्षांत केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित राहिला नाहीतर आम्ही दिलेल्या सेवांचा दर्जा आणि आरोग्यसेवेचा दर्जाही लक्षणीयरीत्या वाढवला आहे. भारतात आणि परदेशात मिळून २३० हून अधिक रुग्णालये असूनयामध्ये महाराष्ट्रातील ३० रुग्णालयांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी आमची बांधिलकी आजही तितकीच दृढ आहे. नव्याने अद्ययावत करण्यात आलेले हे रुग्णालय आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेचे द्योतक आहेजिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण-केंद्रित सेवांची सांगड घालण्यात आली आहे आणि अत्यंत कुशल व समर्पित तज्ज्ञांची टीम ही उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत आहे."

डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल म्हणाले, "डॉअग्रवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आमचा प्रवास गेल्या काही वर्षांत केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित राहिला नाहीतर आम्ही दिलेल्या सेवांचा दर्जा आणि आरोग्यसेवेचा दर्जाही लक्षणीयरीत्या वाढवला आहे. भारतात आणि परदेशात मिळून २३० हून अधिक रुग्णालये आहेतज्यामध्ये महाराष्ट्रातील ३० रुग्णालयांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी आमची बांधिलकी आजही तितकीच दृढ आहे. नव्याने अद्ययावत करण्यात आलेले हे रुग्णालय आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेचे प्रतीक आहेजिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण-केंद्रित सेवांची सांगड घालण्यात आली आहेआणि अत्यंत कुशल व समर्पित तज्ज्ञांची टीम उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करत आहे."

आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री प्रोफेसर डॉ. एस. नटराजन म्हणाले, "हे परिवर्तन म्हणजे जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्याच्या आपल्या ध्येयातील एक मोठा टप्पा आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याचीनेत्रचिकित्सा क्षेत्रातील पुढील पिढीच्या नेतृत्वाला प्रशिक्षण देण्याची आणि नेत्रआरोग्य क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून आपली परंपरा पुढे नेण्याची क्षमता आणखी बळकट झाली आहे. हे शक्य होण्यासाठी सोबत उभे राहिलेल्या आपल्या टीमचेभागीदारांचे आणि समर्थकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."

सध्या भारतासह १० देशांमध्ये २३० हून अधिक रुग्णालयांच्या माध्यमातून डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे कामकाज सुरू आहे. यात मुंबईतील १८ आणि महाराष्ट्रातील एकूण ३० रुग्णालयांचा समावेश आहे. या समूहातर्फे दरवर्षी २० लाखांहून अधिक रुग्णांना सेवा प्रदान करण्यात येते आणि जगभरात २ लाखांहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात येतात. भविष्यात महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आणखी रुग्णालये सुरू करून दर्जेदार नेत्रोपचारांचा अधिक व्यापक प्रसार करण्याच्या दिशेने समूह प्रयत्नशील राहणार आहे.

डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणूनरुग्णालयात ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा ३१ मेपर्यंत उपलब्ध असेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K