राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी प्रो.राम शिंदे ,सभापती विधान परिषद यांचा माईमीडिया च्या “मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड “ विशेष सन्मानाने गौरव

 राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी प्रो.राम शिंदे ,सभापती विधान परिषद यांचा माईमीडिया च्या मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड “ विशेष सन्मानाने गौरव

राजकीय क्षेत्रात संवेदनशील पणे  सामाजिक भान जपत ,ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ,प्रो.राम शिंदे!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडीता. जामखेडजि. अहिल्यानगर येथे ऐतिहासिक वारसा जपणारी शिल्पसृष्टी’ निर्मिती प्रस्तावित आहे. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील न्यायनिवाडेजलसंधारणमहेश्वरकाशीविश्वनाथ पुनरुत्थानवृक्षसंवर्धन या सर्वांचे शिल्पात्मक दर्शन घडवणारी भव्य शिल्पसृष्टी उभारण्याचा संकल्प केला.

 चोंडीस पर्यटनअध्यात्मइतिहास आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष बृहत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गतीमान केली. या आराखड्यात स्मारकाचे सुशोभीकरणसंग्रहालयपर्यटकांसाठी निवासचौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धाररस्ते व वाहनतळ आदी सुविधा समाविष्ट आहेत.

अहिल्याबाई होळकर यांचे कार्य धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान व्यापकतेने अधोरेखित करुन  नारीशक्तीचा आगळा वेगळा सन्मान करणारे ,प्रो.राम शिंदे यांचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया साठी ,माईमीडिया२४   च्या वतीने ; ‘मीडिया एक्सलन्स अवाँर्ड २०२५ मधील  विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास ते उपस्थित राहू शकले नाहीत.म्हणून त्यांच्या विधानभवनातील कार्यालयात जाऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

माई च्या अध्यक्ष शीतल करदेकरमुंबई चे अध्यक्ष चेतन काशीकरमुंबई संघटन समन्वयक गणेश तळेकरमुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे आदीनी हा सन्मान प्रदान केला. याप्रसंगी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या न्यायासाठी लढण्याच्या कार्याचे कोतुक करुन समाज हिताच्या संघटनेच्या कार्यास आपले सहकार्य असे असे आश्वासन ही दिले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K