76 टक्के नर्सिंग स्टाफला पाठीच्या दुखण्याचा व स्नायूंच्या विकारांचा त्रास –
‘गोदरेज इंटरिओ’च्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
· काळजीवाहू कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी व रुग्णांना बरे होण्यात मदत करण्यासाठी नवीन हॉस्पिटल बेड, ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’ सादर.
· अतिदक्षतेचे उपचार, तसेच शiस्त्रक्रियेनंतरचे उपचार घेणाऱ्या सर्वच रुग्णांच्या अत्यधिक काळजीसाठी डिझाईन केलेले ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’ हे प्रीमियम उत्पादन.
मुंबई, 29 जुलै 2021 : आधुनिक आरोग्यसेवा देण्यात येणाऱ्या ठिकाणी वापरण्यासाठी ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’ हा ‘इंटेलिजन्ट सेन्स बेड’ ‘गोदरेज इंटिरिओ’तर्फे सादर करण्यात आला आहे. ही माहिती गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी ‘गोदरेज अॅंड बॉइस’ हिने आज प्रसिद्ध केली. ‘गोदरेज इंटिरिओ’ हा ‘गोदरेज अॅंड बॉइस’चा एक व्यवसाय असून तो घरगुती व कार्यालयीन फर्निचरचा भारतातील एक आघाडीचा ब्रॅंड आहे. हॉस्पिटल बेड्समधील क्रिसलिस श्रेणीमध्ये ही नव्याने भर घालत, ‘गोदरेज इंटरिओ’ने रूग्णांच्या सुरक्षिततेची आणि काळजीवाहू कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती दखल घेतली आहे. या बेडमध्ये ‘लॅटरल टिल्ट’ हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. बेडवर देण्यात आलेल्या ‘अटेंडन्ट कंट्रोल पॅनेल’वरील एका ‘डिजिटल टच’च्या सहाय्याने हा बेड आडव्या स्वरुपात तिरका (लॅटरल टिल्ट) करता येतो. या सुविधेबरोबरच इतरही अनेक सुविधा या बेडमध्ये देण्यात आल्या आहेत.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत, आरोग्यसेवांसाठीच्या पायाभूत सुविधांची कमतरता निर्माण झाली व अनेक रुग्णांना फटका बसला. तसेच कामाचा मोठा ताण असलेल्या परिचारिका व काळजीवाहू कर्मचारी यांच्यावरील तणाव कमाल मर्यादेपर्यंत वाढला. परिचारिकांना शिफ्ट संपल्यानंतरही जास्त वेळ काम करावे लागले. यामुळे स्नायूंचे विकार व सांध्यांची दुखणी यांना तोंड द्यावे लागू शकते. कोविड साथीच्या काळात ‘गोदरेज इंटिरिओ’च्या ‘वर्कस्पेस अॅंड अर्गोनॉमिक्स रिसर्च सेल’ने केलेल्या एका संशोधनानुसार, या कठोरपणे करावयाच्या कामाचे वातावरण आणि संस्कृती यामुळे नर्सिंग स्टाफच्या 76 टक्के कर्मचार्यांमध्ये पाठीचे दुखणे आणि स्नायूंचे त्रास सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे रूग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) जास्त काळ राहिल्यास त्यांनाही बेड सोअर्स व त्वचेचे इतर आजार उद्भवू शकतात.
कामाच्या अतिरिक्त वेळांचा प्रश्न आहेच; परंतु मुळातच काळजीवाहू कर्मचाऱ्यांचे काम हे शारिरीक श्रमाचे असू शकते. रुग्णांना ‘बेड सोअर्स’ होऊ नयेत, म्हणून त्यांना कुशीवर झोपविण्यासाठी हे कर्मचारी रुग्णांना हलवतात, किवा त्यांना एका बेडवरून दुसऱ्या बेडवर झोपवितात. एखाद्या रुग्णाला ‘आयसीयू’मध्ये किंवा दुसर्या वॉर्डमध्ये हलविणे आवश्यक असेल, तर त्यांना प्रत्यक्षपणे उचलून ठेवण्याखेरीज परिचारिकांपुढे दुसरा पर्याय नसतो. रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यास काळजीवाहू कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. याच कारणास्तव, आज भारतातील कंपन्या हुशारीने डिझाइन केलेले, वापरण्यास सुलभ असे हॉस्पिटल बेड तयार करीत आहेत.
या बेड्समुळे रुग्णांपासून काळजीवाहू कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व संबंधितांच्या कार्यक्षमतेवर चांगले परिणाम होऊ शकतात.
रुग्णांना हाताळण्याच्या समस्यांचे निराकरण म्हणून, ‘गोदरेज इंटिरिओ’च्या ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’सारख्या हॉस्पिटल बेडमध्ये एक बुद्धिमान तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे बेडच्या संपूर्ण स्थितीत बदल करता येतात, तसेच बेड आडव्या स्थितीत तिरका (लॅटरली टिल्ट) करता येतो. यासाठी ‘डिजिटल टच अटेंडंट कंट्रोल पॅनेल’ देण्यात आलेला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे रुग्णालयांना त्यांचा वेळ आणि पायाभूत सुविधा प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतील आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक रूग्णांवर उपचार करता येतील. परिचारिका आणि काळजीवाहू कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेण्याव्यतिरिक्त, यामुळे रुग्णांच्या आरामात सुधारणा होते; कारण एका बाजूकडे झुकल्यामुळे त्यांचा सोअर्सचा आणि अल्सरचा त्रास कमी होतो. शिवाय, यातील विशिष्ट तंत्रज्ञानामुळे रुग्णाची सुरक्षादेखील सुनिश्चित होते - साइडबोर्ड बंद असतानाच बेड झुकू शकतो आणि बेडवरील वजन कमी असल्यास बेडमधील गजर कार्यान्वित होतो.
क्रिसलिस श्रेणी हे एक प्रीमियम आणि अनेक वैशिष्ट्ये असलेले सोल्यूशन आहे. रुग्णांची विशेष काळजी ज्या ठिकाणी घेतली जाते, अशा ‘आयसीसीयू’, ‘आयसीयू’, आणि ‘सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्स’साठी ते खास डिझाइन केलेले आहे.
नवीन उत्पादनाच्या सादरीकरणाप्रसंगी ‘गोदरेज इंटरिओ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथूर म्हणाले, “दररोज व सर्व ठिकाणी लोकांचे जीवनमान समृद्ध करता यावे, हे ध्येय आम्ही गोदरेज इंटरिओमध्ये बाळगतो.
भारतीय आरोग्यसेवा क्षेत्र सध्या वेगाने वाढत आहे. त्याची व्याप्ती, त्यातील अनेकविध सेवा वाढल्या असून सार्वजनिक व खासगी संस्थांनीही खर्च वाढवले आहेत. तथापि, यात रुग्णांना आवश्यक असणारा आराम व सुरक्षितता, तसेच काळजीवाहू कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या रुग्ण हाताळणीच्या सुविधा, ज्या ‘आयसीसीयू’, ‘आयसीयू’सारख्या ठिकाणी लागतात, त्यांची व तत्सम वातावरणाची कमतरता भासते. आरोग्यसेवा उद्योगाला ज्या अनन्य आव्हानांना सामोरे जावे लागते, त्यांची दखल घेत आम्ही ‘गोदरेज इंटरिओ’मध्ये काम करीत असतो. ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’ हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. हा बेड काही अंगभूत वैशिष्ट्यांनी डिझाईन करण्यात आला आहे. यातील ‘लॅटरल टिल्ट’ या सुविधेमुळे रुग्णाला एका कुशीवर किंवा तिरके करणे ही क्रिया अगदी सहजपणे होते आणि परिचारिकेचा त्रास वाचतो. तसेच रुग्णाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी एक उपचाराची उत्तम सुविधा निर्माण होते. गोदरेज इंटरिओ येथे, आरोग्य सेवांमधील अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवनवे उपाय शोधण्यात आम्हाला अभिमान वाटतो.”
‘गोदरेज इंटिरिओ’चे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट समीर जोशी म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सन 2022 मध्ये भारतातील आरोग्यसेवेचा महसूल 372 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. 2016पासून या उद्योगाची वाढ दरसाल सरासरी 22 टक्क्यांनी होत आहे; तथापि, भारतातील आरोग्य सुविधा बर्याच वेळा बदलत्या गरजांच्या तुलनेत कमी पडतात. उपचारांच्या प्रक्रियेत रूग्ण आणि त्याच्या कुटुंबास मदत करणारे वातावरण तयार करण्यावर ‘गोदरेज इंटरिओ’च्या आरोग्यसेवा व्यवसायात भर देण्यात येतो. या अर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या उपचारांच्या सुविधांमध्ये रुग्ण, काळजीवाहक आणि डॉक्टरांसह सर्व संबंधितांची कार्यक्षमता, सहानुभूती आणि हित यांवर भर देण्यात येतो. नव्याने सादर झालेल्या ‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह हॉस्पिटल बेड’मधून आमच्या डिझाईनचे तत्त्वज्ञान अधोरेखित होते, जे मानवी-केंद्रित दृष्टिकोन अवलंबण्यावर आणि रूग्ण-डॉक्टरांच्या सुधारित परस्परसंवादासाठी अनुकूलित जागेचे सोल्यूशन वापरण्यावर आधारित आहे.”
‘क्रिसलिस नोवा अॅक्टिव्ह’ हे ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स’मधील ‘आयसीसीयू’, ‘आयसीयू’ अशा खास उपचार होणाऱ्या विभागांसाठी ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ आहे. काळजीवाहू कर्मचाऱ्यांच्या कामाचा बोजा प्रत्यक्षपणे कमी करण्याची क्षमता या बेडमध्ये आहे. विशेषतः कोविड साथीच्या काळात काळजीवाहकांवरील कामाचा ताण वाढलेला असताना या सुविधेचा फार चांगला उपयोग होण्यासारखा आहे.
Comments
Post a Comment