कॅप्री ग्लोबल कॅपिटलने चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून केली श्री. राहुल अगरवाल यांची नियुक्ती
कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) या डायव्हर्सिफाइड एनबीएफसीने चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (सीटीओ) म्हणून श्री. राहुल अगरवाल यांनी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती जुलै १६, २०२१ या तारखेपासून लागू झाली आहे.
या नवीन भूमिकेत श्री. अगरवाल तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम करतील आणि कंपनीतील सर्व तंत्रज्ञानविषयक कामाची जबाबदारी त्यांच्यावर राहील. डिजिटल रूपांतरणाचे उपक्रम राबवणे, टेलर-मेड सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान इंटरफेसेस तैनात करणे तसेच सीजीसीएल उत्पादन प्रवर्गांसाठी धोरणात्मक आयटी सोल्युशन्स विकसित करणे या कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा या नियुक्तीबद्दल म्हणाले, “सीजीसीएल, क्षेत्रातील आवश्यक ते कौशल्य व वेगवान कार्यान्वयन यांच्या माध्यमातून, डिजिटल रूपांतरण जलदगतीने करण्यासाठी सज्ज आहे. या रूपांतरणासाठी बिझनेस मॉडेल्सचे नव्याने इंजिनीअरिंग करणे आवश्यक आहे. ही मॉडेल्स केवळ नवीन तंत्रज्ञान व प्लॅटफॉर्म्सचा अंगिकार करणारी नसावी, तर त्यांचे सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसाय प्रक्रियांमध्ये एकात्मीकरण करणारी असावी. जेणेकरून सर्वोत्तम दर्जाच्या सेवा देता येतील. अनेक शाखांतील कौशल्य गाठीशी असलेल्या श्री. अगरवाल यांची आमचे सीटीओ म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. सीजीसीएलच्या तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोनाला तसेच उत्पादनाच्या दिशेला नवीन स्वरूप देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील आणि हे दोन घटक येत्या वर्षात कंपनीच्या विस्तार प्रवासाचे आधारस्तंभ ठरतील.”
श्री. अग्रवाल यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्वाच्या पदांवर काम केले आहे आणि उत्पादने, प्लॅटफॉर्म व सेवांच्या विकासातील १७ वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्याकडे आहे. उद्योगाच्या विविध क्षेत्रांतील टीम्सचे नेतृत्व त्यांनी केले आहे. सीजीसीएलमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे ग्रुप सीटीओ म्हणून तसेच PolicyBazaar.comचे सीटीओ म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे लावा इंटरनॅशनलमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांना टेक इंटिग्रेशन, उत्पादन/तंत्रज्ञान ओनरशिप, सिस्टम डिझाइन/आर्किटेक्चर, बिझनेस सोल्युशन डिझाइन या विविध क्षेत्रांत काम करण्याचा तसेच अत्यंत मोठी व्याप्ती असलेल्या सिस्टम्स विकसित करण्याचा अनुभव आहे. एडब्ल्यूएल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच बिग डेटा प्रोसेसिंग व अॅनालिटिक्स सिस्टम्सचे सखोल ज्ञान त्यांच्याकडे आहे.
श्री. अगरवाल दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे (आयआयटी) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी इंडियाहोम्स.कॉम, टारू मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्लिकेबल, वृत्ती इन्फोकॉम, ट्रायबल फ्युजन आणि टॅव्हण्ट टेक्नोलॉजीज या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
Comments
Post a Comment