अभिमन्यू – लतिकाच्या नात्यात येणार कायमाचा दुरावा ?

मुंबई १२ जुलै, २०२१ : कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले. आणि हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे. एकीकडे अभिमन्यूने आईला दिलेले वचन की, मी लतिकाला घरी परत घेऊन येणार. तर दुसरीकडे, लतिकाने बापूंना दिलेला शब्द. लतिका बापूंच्या विरुध्द जाऊन अभिमन्यूला साथ देईल ? हे सगळंच प्रेक्षकांना हळूहळू मालिकेमधून कळणार आहे. अभिमन्यू – लतिका या संकटाला कसे सामोरे जातील ? कशी एकमेकांची साथ देतील ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर.

वटपौर्णिमेच्या दिवशी अभिमन्यू आणि लतिकाचे जुळू पाहणारं नातं पुन्हा दुरावलं. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून  मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं. अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहे. मालिकेमध्ये पुढे काय घडेल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..