सलमान खानच्या राधेच्या निर्मात्याचे नादखुळा म्युझिक लेबलव्दारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

सलमान खानच्या हॅलो, बॉडीगार्ड, ओ तेरी, भारत, राधे अशा बिग बजेट बॉलीवूड सिनेमाचा निर्माता निखील नमीतने मराठी सिनेसृष्टीत आपल्या म्युझिक लेबलव्दारे पदार्पण केले आहे. गेली 16 वर्ष बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवल्यावर आता आपल्या नादखुळा म्युझिक लेबलव्दारे निखील नमित मराठी मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज आहे.

मराठीत पदार्पणाविषयी निर्माता निखील नमीत म्हणाले, नादखुळा म्युझिक लेबल सुरू करण्यामागची प्रेरणा माझे स्वर्गीय वडिल आहेत. भूगोलाचे गाढे अभ्यासक असलेले माझे वडिल, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते.  मुंबई विद्यापीठाच्या भूगोल शाखेचे प्रमुखपदही त्यांनी भुषवलंय. अमेरिकेत जाऊन पोस्ट-डॉक्टरेट घेतलेल्या माझ्या वडिलांना मराठी गाण्यांमध्ये रस होता, हे मला त्यांच्या निधनानंतर कळले. मी बॉलीवूड सिनेमांची निर्मिती केलीय. पण माझ्या वडिलांनी कधी हिंदी सिनेमे पाहिलेलेही मला आठवत नाहीत. त्यांचे नुकतेच 11 मार्चला निधन झाले. निधनानंतर त्यांचा मोबाईल मी माझ्या जवळ ठेवला. तेव्हा एकेदिवशी त्यांच्या मोबाईलची रिंगटोन ही मराठीतले एक नुकतेच रिलीज झालेले गाणे असल्याचे मला लक्षात आले. आणि मग पूढच्या काही दिवसांमध्ये त्यांचे आवडत्या मराठी गाण्यांचे खूप मोठे कलेक्शन माझ्या हाती लागले. त्यानंतर, नादखुळा म्युझिल लेबलव्दारे मराठी सुमधूर गाण्यांची निर्मिती करण्याचे मी ठरवले.

निखील नमीतच्या नादखुळा म्यझिक लेबलला प्रशांत नाकती ह्या मराठी सिनेसृष्टीतल्या गुणी, आणि सुप्रसिध्द संगीतकाराची उत्तम साथ मिळालीय.  पोरी तुझ्या नादानं’ आणि माझी बाय गो’ फेम प्रशांत नाकतीच्या गाण्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या गाण्यांना युट्यूबवर सहज करोडोंमध्येच व्ह्युज मिळतात. त्याच्या 17-18 गाण्यांना युट्यूबवर मिलीयनमध्ये व्ह्युज मिळाल्याने आता त्याची ओळख मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनीयर म्युझिक डायरेक्टर अशी होऊ लागली आहे. प्रशांतसोबत मिळून निखील नमितने आता नादखुळा म्युझिक लेबल सुरू केले आहे. आणि त्यांच्या मी नादखुळा ह्या पहिल्या गाण्यालाही आत्तापर्यंत साडेसहा लाख व्हयुज मिळाले आहेत.

नादखुळा म्युझिक लेबलबद्दल प्रशांत सांगतो,निखीलदादाने माझी बाय गो गाणे ऐकुन मला त्याच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. माझ्यासाठी तर एवढ्या मोठ्या माणसाने मला ऑफर देणे, हाच सुखद आश्चर्याचा धक्का होता. पहिल्या भेटीतच आमचे ऋणानुबंध जुळले आणि निखील दादासोबत मी नादखुळा म्युझिक लेबलची सुरूवात केली. मराठी माणसाला संगीताची उत्तम समज असते, असं मानलं जातं. त्यामुळे आमच्या ह्या म्युझिक लेबल मधून उत्तमोत्तम मराठी गाण्यांची निर्मिती करायचा, नवोदितांना व्यासपीठ देण्याचा,आमचा मानस असेल. गायक, संगीतकार,गीतकार, अभिनेते,ते अगदी कॅमेरामन, नृत्यदिग्दर्शक अशा सर्वप्रकारच्या मराठीतल्या नव्या प्रतिभेला वाव देण्याचा आमचा नेहमीच 

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार