एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज आणि धनलक्ष्मी बँक लिमिटेड’ची भागीदारी
आपल्या ग्राहकांना 3-इन-1 खाते उपलब्ध करून देण्याकरिता एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज आणि धनलक्ष्मी बँक लिमिटेड’ची भागीदारी
21 जुलै 2021, दिल्ली: एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडच्या वतीने आज धनलक्ष्मी बँक’ सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून बँकेच्या ग्राहकांना ऑनलाईन ट्रेडिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भागीदारीतून बचत, डीमॅट आणि ट्रेडींग असे एकात्मिक 3-इन-1 खाते उपलब्ध करून देण्यात येणार असून www.smctradeonline.com पोर्टल तसेच मोबाईल ट्रेडींग अॅप (एसएमसी एस) आणि डेस्कटॉप आधारीत सॉफ्टवेयरद्वारे धनलक्ष्मी बँक ग्राहकांना गुंतागुंत-मुक्त आणि सुलभ ट्रेडिंग अनुभव घेता येईल.
हा ट्रेडिंग मंच अत्याधुनिक, एकात्मिक वापर हा वेगवान, सुरक्षित आणि गुंतागुंत-मुक्त व्यवहारांकरिता तयार करण्यात आला आहे. या भागीदारीने एसएमसी ग्लोबल’ ला बँकेचे अस्तित्व केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि देशाच्या अन्य भागांत निर्माण करून ग्राहक बळ मजबूत करण्याला चालना मिळणार आहे. या भागीदारीमुळे खातेधारकांना अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देणे आणि जास्तीचा महसूल निर्माण करण्यासाठी मदत होईल.
या सुविधेतंर्गत एसएमसी ग्लोबल ट्रेडिंग खाते उघडेल तसेच ग्राहकांकरिता बँक खाते आणि डीमॅट खात्याची सुविधा उपलब्ध करून देईल.
या प्रसंगी बोलताना एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे संचालक आणि सीईओ अजय गर्ग म्हणाले की, “धनलक्ष्मी बँकेसोबत भागीदारी एसएमसीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईल आणि डेस्कटॉप’ च्या आधारे गुंतवणूक आणि ट्रेडिंगचा वेगवान, सुरक्षित आणि गुंतागुंत-मुक्त अनुभव मिळेल. भारताच्या दक्षिण भागात एसएमसी’ ला आपले अस्तित्व आणि ग्राहक बळ वाढविण्यासाठी मदत मिळेल.”
Comments
Post a Comment