आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे शिर्षकगीत नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला !

 

 

 

मुंबई २० जुलै२०२१ : गेलं दोन वर्ष अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेचे शिर्षकगीत अजूनही घराघरांत तितकंच लोकप्रिय आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे ८०० हून अधिक भाग पूर्ण झाले असूनआषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या मालिकेचे शिर्षकगीत एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जो अजूनही कायम आहे. अगदी पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाण सोपे नाहीयामध्ये संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी.

 

रसिक प्रेक्षकांचे मालिकेवरील प्रेम असेच कायम राहो. अश्याच अजुन सुरस कथा मालिकेच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तेव्हा बघत रहा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” सोम ते शनि संध्या ७.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..