एशिया पॅसिफिक ज्युनियर अचिव्हमेंट इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धेसाठी
तीन भारतीय विद्यार्थ्यांच्या संघांची निवड
भारतीय फेडएक्स / ज्युनियर अचिव्हमेंट इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धेसाठी ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी
भारत, मुंबई, १२ जुलै, २०२१: फेडएक्स कॉर्प (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातल्या सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वाहतूक कंपनीपैकी एक असणाऱ्या फेडएक्स एक्स्प्रेसने टी/गेल्फ ज्युनियर अचिव्हमेंट (जेए) इंडिया यांच्या सहयोगाने भारतासाठी पहिली फेडएक्स/ जेए इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. जागतिक संपर्कव्यवस्थेची तत्वं सर्वोत्तम पद्धतीने दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांनी चालविलेल्या व्यवसायांची दखल या स्पर्धेतर्फे घेण्यात येत आहे.
मे ते जुलै २०२१ दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत व्हर्च्युअल कार्यशाळांची मालिका सादर झाली. त्यामध्ये भारतभरातील २५ शाळांमधील ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेत संवादात्मक अध्ययन सत्र, प्रेरणादायी व्याख्यानं, फेडएक्स, टीगेल्फ/जेए इंडिया मधल्या मार्गदर्शकांशी संवाद आणि आर्थिक बाबी, पुरवठा शास्त्र जागतिक व्यापार याविषयी उद्योगक्षेत्रातील तज्ञांचे विचार या गोष्टींचा समावेश होता.
प्रादेशिक पातळीवर सहभागी होण्यासाठी निवडण्यात आलेले तीन विद्यार्थी संघ स्प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली, लर्निंग पाथ स्कूल, मोहाली आणि पद्म शेषाद्री बाल भवन सिनियर सेकंडरी स्कूल, चेन्नई हे आहेत. हे संघ ऑगस्ट मध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
फेडएक्स एक्स्प्रेससाठी इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहम्मद सायेघ म्हणाले, “भारतातील आणि जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने नवीन व्यावसायिक कल्पना विकसीत करून त्या सादर करण्याचे आव्हान स्वतःलाच देणाऱ्या सगळ्या तरुण उद्योजकांचे अभिनंदन. या वेगाने बदलणाऱ्या व्यवसायिक वातावरणात देशभरातील तरुणांना चालना, प्रेरणा आणि सक्षम करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधता आल्याचा आम्हांला खूप आनंद होत आहे. इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंजने भारतीय विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय सार आणि व्यावसायिक कौशल्यं यांना उत्तेजन दिले आहे. त्याचवेळी व्यावहारिक, उपयुक्त व्यावसायिक प्रस्तावांच्या माध्यमातून सर्जनशील व्यावसायिक कल्पना विकसीत करण्यासाठी पाठबळ देत आहे.”
जेए एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माझिअर साबेत म्हणाले, “जागतिक पातळीवर सर्वत्र महामारीचे संकट असतानाही प्रथमच आम्हांला भारतातील आपल्या लहान उद्योजकांना १५ व्या आयटीसी आशिया पॅसिफिक स्पर्धेत सहभागी करून घेण्याची संधी मिळू शकली याबद्दल खूप कृतार्थ वाटत आहे. भारतातील आपल्या विद्यार्थ्यांनी अविचलता आणि लवचिकता, आनंदी वृत्ती यांचे दर्शन घडवले. उद्योजकता ही नेतृत्वासंदर्भात असते आणि भारतातल्या आपल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचे यथार्थ दर्शन घडविले.”
Comments
Post a Comment