‘यारी दोस्ती’चे सच्चे यार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘यारी दोस्ती २’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच

दोस्ती हा सिनेदिग्दर्शकांचा नेहमीचा आवडीचा विषय असल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. याच कारणामुळे वरचेवर दोस्तीवर आधारित असलेले चित्रपट बनत असतात. यातील प्रत्येक चित्रपट आपलं वेगळेपण जपत या अनोख्या नात्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. असेच आजवर कधीही समोर न आलेले दोस्तीतील पैलू मांडणा-या ‘यारी दोस्ती’ या चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. ‘यारो दोस्ती’ला युटयुबवर ८.२ मिलियन्स व्ह्यूज मिळाले असून, ५२ हजार लाईक्सही मिळाले आहे. या यशानंतर पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स आणि बुद्ध टेलिफिल्म्स प्रा. लि. या बॅनरअंतर्गत ‘यारी दोस्ती २’ या शीर्षकांर्गत ‘यारी दोस्ती’च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे.

पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स आणि बुद्ध टेलिफिल्म्स प्रा. लि.ची निर्मिती असलेल्या ‘यारी दोस्ती २’ची सहनिर्मिती ऑडिओ लॅब मीडिया कॉर्पोरेशन करत आहे. सोशल मीडियावर मोशन पोस्टर लाँच करत निर्मात्यांनी ‘यारी दोस्ती २’ची अधिकृत घोषणा केली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागाचं लेखन आणि दिग्दर्शनही शांतनू अनंत तांबे करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘यारो दोस्ती’ला युटयुबवर ८.२ मिलियन्स व्ह्यूज मिळाले असून, ५२ हजार लाईक्सही मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यश आणि डिजिटल माध्यमाद्वारे मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम पाहता ‘यारी दोस्ती २’ला तूफान प्रतिसाद मिळणार असल्याची खात्री दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांना आहे.

टायटलप्रमाणे या चित्रपटाचं कथानक मैत्री, मित्र आणि मित्रांच्या विश्वाभोवती गुंफण्यात आलं आहे. आजवर ब-याच दिग्दर्शकांना आपापल्या परीनं मैत्रीची व्याख्या मांडण्याचा यशोचित प्रयत्न केला आहे. ‘यारी दोस्ती २’ हा चित्रपट आजवर कधीही न समोर आलेले मैत्रीचे पैलू सादर करणार आहेच, त्यासोबतच मैत्रीची नवी व्याख्याही मांडणार आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल. त्यांना आपल्या जवळच्या मित्राची आठवण करून देईल. जे मित्र काही कारणास्तव दुरावले गेले असतील किंवा कामानिमित्त एकमेकांपासून दूर गेले असतील त्यांना पुन्हा एकत्र आणेल. त्यांना पुन्हा एकदा मैत्रीच्या धाग्यात घट्ट बांधेल. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर सहजपणे रूळतील आणि गीत-संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल. या चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता हंसराज जगताप, आकाश वाघमोडे, सुमित भोस्के, आशिष गाडे, संदिप गायकवाड, शिल्पा ठाकरे, संकेत हेगणा आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण रविचंद्रन थेवर करणार असून समीर शेख संकलनाची बाजू सांभाळणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..