झी मराठीवर 'ती परत आली ये'

झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलंमालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवलीपण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेमालिकेचं नाव आहे 'ती परत आलीये'.

नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झालाजेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेतविजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेतप्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेतनक्की ही भानगड काय आहेया मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेतही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

या मालिकेचं लेखन 'देवमाणूसया लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहेत्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही.

या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, "या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेलइकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का?  ती परत आलीये म्हणजे नक्की कोणया प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतीलएका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहेमाझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेलप्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे."

Promo Link - https://www.instagram.com/p/CReJ3bzD3Im/?utm_source=ig_web_copy_link

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..