शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा व शैक्षणिक साहित्यांचे वाटप
राजिप शाळा वावे येथील विद्यार्थ्यांना क्रिडा व शैक्षणिक साहित्यांचे वाटप
सुधागड पाली ( BDN) : सुधागड तालुक्यातील व पोटलज गावचे सुपुत्र दिलीप धनावडे हे नोकरी धंद्या निमित्त शहरात गेले असले तरी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या गावाकडील विद्यार्थ्याना शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत व्हावी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाला मदत व सहकार्य करण्याचे मनात ध्येय ठेऊन डोंबिवलीचे समाज सेवक बाळा म्हात्रे,सोमनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली राजीप शाळा वावे येथील विद्यार्थ्याना मोफत वह्या व शैक्षणिक लेखन साहित्य तसेच क्रीडा क्षेत्रातील साहित्य वाटप दि.18 जुलै रोजी करण्यात आले.
यावेळी घपकी पंचक्रोशी अध्यक्ष नाना जगताप,सामाजिक कार्यकर्ता दिलीप धनावडे,शिवसेना उपविभागप्रमुख अरविंद मानकर, सचिन म्हामुणकर,अजित चव्हाण, राजिप शाळा वावे मुख्याध्यापक स्मिता वामन म्हस्के, केंद्र प्रमुख सुगंधा म्हस्के,उप शिक्षिका संदीपा कोकाटे,ज्येष्ठ कार्यकर्ता लक्ष्मण म्हस्के, शिक्षण प्रेमी हभप शरद म्हस्के आदींसह पालक वर्ग व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment