पेटीएम ऑल-इन-वन पीओएस मशीनमुळे लघु व्‍यावसायिक बनले ई-कॉमर्स कंपन्‍यांइतके सक्षम;

मिळाली ईएमआय, कॅशबॅक देण्‍याची सुविधा 

  • आकर्षक सूट, दुकानांमध्‍ये वाढीव उपस्थितीच्‍या माध्‍यमातून व्‍यवसायासाठी विक्रीला चालना  
  • व्‍यापारी पीओएस डिवाईसच्‍या माध्‍यमातून ई-कॉमर्स कंपन्‍यांसारख्‍या ग्राहकांना नो-कॉस्‍ट ईएमआय, बँक ऑफर्स, कॅशबॅक देण्‍यामध्‍ये झाले सक्षम  
  • ऑल-इन-वन पीओएस सेवा व्‍यापा-याना देते पेटीएम वॉलेट, क्‍यूआर कोड्सच्‍या माध्‍यमातून सर्व यूपीआय अॅप्‍स, क्रेडिट व डेबिट कार्डसद्वारे पेमेण्‍ट स्‍वीकारण्‍याची सुविधा  
  • द्वितीय, तृतीय श्रेणीच्‍या व त्‍यावरील श्रेणीच्‍या शहरांमधील अधिकाधिक दुकानदार, लघु व्‍यवसायांचे मालक आता पेटीएम ऑल-इन-वन पीओएस डिवाईसेसचा अवलंब करत आहेत 


भारताचे आघाडीचे डिजिटल आर्थिक सेवा प्रदाता व्‍यासपीठ पेटीएमने आज घोषणा केली आहे की, त्‍यांचे ऑल-इन-वन पीओएस डिवाईस देशभरातील सर्व व्‍यवसायांसह लहान दुकानदार, रिटेलर्सना अव्‍वल बँका व भागीदार ब्रॅण्‍ड्सकडून ईएमआय ऑफर्स, कॅशबॅकसह सक्षम करत आहे. कंपनी ऑफलाइन व्‍यापा-यांना ई-कॉमर्स कंपन्‍यांसारख्‍याच डिल्‍स त्‍यांच्‍या ग्राहकांना देण्‍यामध्‍ये सक्षम करत आहे आणि मोठे रिटेलर्स त्‍यांना डिजिटल क्रांतीमध्‍ये सामील होण्‍यासाठी व देशव्‍यापी लॉकडाऊन्‍स काही अंशत: शिथिल होत असताना त्‍यांच्‍या स्‍टोअर्समध्‍ये ग्राहकांची उपस्थिती वाढवण्‍यामध्‍ये मदत करत आहेत. व्‍यासपीठाने आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामुळे व्‍यापा-यांना त्‍यांच्‍या ग्राहकांना सर्वोत्तम कॅशबॅक ऑफर्स, नो-कॉस्‍ट ईएमआय-डील्‍स, सुलभ व किफायतशीर हप्‍ते अशा सुविधा देता येतील. तसेच व्‍यासपीठाने फॅशन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व इतर उत्‍पादनांवर आकर्षक सूट देण्‍यासाठी आघाडीच्‍या ब्रॅण्‍ड्ससोबत देखील सहयोग केला आहे. 

पेटीएमचे प्रवक्‍त म्‍हणाले, ''सर्व व्‍यवसायांसह ऑफलाइन दुकानदार, रिटेलर्स लाखो व्‍यक्‍तींना रोजगार देतात आणि देशाच्‍या एकूण अर्थव्‍यवस्‍थेचे ते महत्त्वपूर्ण भाग आहेत. पेटीएम ऑल-इन-वन पीओएस डिवाईसच्‍या माध्‍यमातून आम्‍ही त्‍यांना ई-कामर्स कंपन्‍या ऑनलाइन ऑफर करणा-या त्‍याच सवलती व बँक डिल्‍स देण्‍यामध्‍ये सक्षम करत आहोत. याव्‍यतिरिक्‍त ते तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची गुंतवणूक न करता सुलभपणे त्‍यांच्‍या व्‍यवसायाचे कार्यसंचालन डिजिटाईज करू शकतात. आमचे डिवाईस व्‍यवसायांना त्‍यांची कार्यक्षमता सुधारण्‍यासाठी अत्‍यावश्‍यक डिजिटायझेशन पाठिंबा देत आहे आणि डिजिटल भारत मिशनमध्‍ये सामील होण्‍यासाठी साह्य करत आहे.''  

ऑल-इन-वन पीओएस डिवाईस कार्ड स्‍वाइप्‍स व क्‍यूआर कोड्सच्‍या माध्‍यमातून पेमेण्‍ट्स स्‍वीकारतात आणि जीएसटी प्रमाणित बिले तयार करण्‍यासाठी व सर्व व्‍यवहार व सेटलमेण्‍ट्सच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी 'पेटीएम फॉर बिझनेस' अॅपमध्‍ये एकीकृत आहे. तसेच पेटीएम फॉर बिझनेस अॅप व्‍यापा-यांना उधार, रोख व कार्ड विक्री अशा सर्व व्‍यवहारांच्‍या डिजिटल लेजरचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी कर्ज, विमा व बिझनेस खाता अशा अनेक व्‍यवसाय सेवा व आर्थिक सेवा उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये मदत करते.    

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..