किडनीचे जुनाट दुखणे असलेल्या रुग्णांची पर्यायी उपचारपद्धती म्हणून पेरिटोनियल डायलिसिसवर मदार

कोव्हिड-१९ आणि घराबाहेर पडण्याच्या भीतीमुळे घरच्या घरी करता येणा-या उपचारपद्धती स्वीकारणे रुग्णांसाठी अपरिहार्य

कोरोनाव्हायरसचा धोका आणि भीती यांची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने लोक पुन्हा एकदा आपापल्या घरांमध्ये कोंडली गेली आहेत. वर्ष २०२० मध्ये आरोग्यक्षेत्रातील पायाभूत यंत्रणेतील त्रुटी उघड झालेल्या आपण पाहिल्या. गंभीर आरोग्यसमस्यांच्या सोडवणुकीला पाठबळ देण्यातील या यंत्रणेची असमर्थता दिसून आली. लॉकडाऊनमध्ये दळणवळणावर परिणाम झाला, आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेमध्ये अडचणी आल्या व औषधे,उपयोग्य वस्तू, बाह्यरुग्ण सेवा तसेच इनपेशंट सेवांवरही मर्यादा आल्या. दुर्दैवाने यावर्षीच्या अधिक विनाशकारी दुस-या लाटेचा फटका अधिक प्रमाणात बसला, ज्याचा परिणाम किडनीरोगग्रस्तांसह सर्वच असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांच्या देखभालीवर झालेला दिसला.

भारतामध्ये दरवर्षी २० लाखांहून अधिक किडनीरोगग्रस्तांची भर पडत असते, ज्यांना वर्षाकाठी ३४ दशलक्ष डायलिसिस सत्रांची गरज भासते. ताज्या किडनी इंटरनॅशनल रिपोर्टनुसार किडनीचे आजार असलेल्या रुग्णांवर लॉकडाऊनचा कसा व किती परिणाम झाला हे निश्चित करण्यासाठी एक सर्वेक्षण हाती घेण्यात आले. सुमारे ७१० (२८.२ टक्‍के) रुग्णांची डायलिसिसची एकाहून जास्त सत्रे चुकली, ६९ (२.७४ टक्‍के) रुग्णांना तातडीच्या डायलिसिसची गरज भासली, १०४ (४.१३ टक्‍के) रुग्णांनी डायलिसिससाठी जाणे थांबवले तर ९ (०.३६ टक्‍के) रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले. हॉस्पिटल्समध्ये बाह्यरुग्ण विभागाला भेट द्यायला येणा-या रुग्णांचे सर्वेक्षण केले असता अशा रुग्णांची संख्या ९२.३ टक्क्यांनी खाली आल्याचे आढळून आले तर इनपेशंट अर्थात हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांसाठीच्या सेवेचे प्रमाण ६१ टक्क्यांनी घटले. टेलिकन्सल्टेशन सुरू करण्यात आले मात्र अगदी मोजक्या रुग्णांनाच या सेवेचा लाभ घेता आला.

डॉआकाश शिंगाडावोक्हार्डट हॉस्पिटलमुंबई येथील नेफ्रॉलॉजिस्टआणि प्रत्यारोपणतज्ञकोविड-१९ च्या रूग्णांना प्राधान्य देण्यामुळे रूग्णालयांवर अतिरिक्त भार पडत असताना आपण इतर आजारांसाठी शक्य असेल तिथे जास्तीत जास्त रूग्णांच्या दूरस्थ उपचारांच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहेमूत्रपिंडाच्या रूग्णांबाबत देशातील मूत्रपिंड निकामी झालेल्या लोकांना हेमोडायलिसिसचे उपचार देण्याऐवजी घरातून आणि वाजवी दरातील पीडी उपचारांद्वारे नेफ्रॉलॉजिस्ट्स ना या रूग्णांवर उपचार करणे सोपे जाईल.याचा फायदा रूग्ण आण डॉक्टर या दोघांनाही रूग्णाच्या जीवनशैलीवर आधारित राहून आपल्या आवडीच्या डायलिसिस उपचारांची निवड करता येईलतसेचपीडीमुळे रूग्णांना आपल्या घरातून डायलिसिसचे उपचार आपल्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ  देता आणि हॉस्पिटलला भेट देत असताना कोविड-१९ किंवा इतर संसर्ग होण्याच्या धोक्यापासून त्यांना सुरक्षित ठेवून घेता येतीलया प्रगतीमुळे रूग्णांना वेदनारहितघरच्याघरीआणि वाजवी दरातील थेरपीचे अतिरिक्त मूल्याधारित फायदे मिळू शकतील.

या काळात मधुमेह आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांच्या आयुष्याची घडीच विस्कटून गेली. कारण विशेषत: हीमोडायलिसिस (एचडी) वर असलेल्या रुग्णांना डायलिसिससाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार (एमओएचएफअॅण्‍डडब्‍ल्‍यू)*क्रॉनिक किडनी डिजिज (सीकेडीसारखे आनुषंगिक आजार असलेल्या व डायलिससिवर असलेल्या रुग्णांना या प्राणघातक विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. सीकेडी हे भारतातील मृत्यू आणि अपंगत्वामागचे एक प्रमुख कारण आहे. तेव्हा येथील आरोग्यव्यवस्थेमध्ये हॉस्पिटलमधून होऊ शकणारा संसर्ग टाळण्यासाठी अधिकाधिक भर व्हिडिओ कन्सल्टेशन्स, रुग्णांचे दुरून व्यवस्थापन करणे व बिगर कोव्हिड-१९ रुग्णांसाठीच्या इतर उपाययोजनांवर देण्यात आला.

क्रॉनिक किडनी डिजिज, मधुमेह इत्यादी आजारांचे रुग्ण वेळच्यावेळी उपचार मिळविण्यासाठी झगडत आहेत. या रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे व हॉस्पिटल्स आणि इतर आरोग्यकेंद्रांना कोव्हिड-१९ उपचार केंद्रे बनविण्यात आल्याने त्यांना उपचार मिळणे अशक्य होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सीकेडीच्या रुग्णांना व हीमोडायलिसिसवर असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत प्रवास करणे कठीण जात आहे, कारण अशा हॉस्पिटलभेटींमध्ये त्यांना कोव्हिडची लागण होऊ शकते. अशावेळी प्रगत वैद्यकीय पर्यायांच्या साथीने आता रुग्णांना घरच्याघरीच पेरिटोनियल डायलिसिस (पीडी) उपचार करून घेता येणे शक्य आहे.

पीडीपद्धत रुग्णांना मुक्तपणे हालचाल करण्याची मुभा देते व त्यांना लवचिक जीवनशैली जगता येते. हे उपचार आपल्या सोयीने करता येतात, पारंपरिक हीमोडायलिसिसमध्ये रुग्णांना आठवड्यातून ३-४ वेळा हॉस्पिटलला भेट द्यावी लागते, मात्र पीडीमध्ये या गोष्टीची काळजी करावी लागत नाही. पीडीमुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वारंवार जाणे टाळता येते आणि ही पद्धत सर्वसाधारणपणे कमी खर्चिक आणि व्यवहार्य आहे कारण हे डायलिसिस घरच्या घरीच पार पाडता येते व त्यासाठी फारशा सोयीसुविधांची गरज भासत नाही.

पीडीउपचारपद्धतीमध्ये इतके फायदे मिळण्याची शक्यता असूनही देशाभरामध्ये ही पद्धत खूपच कमी प्रमाणात पोहोचलेली दिसते. एका अहवालानुसार २०१९मध्‍ये भारतातपीडीचे केवळ ८,५००रुग्ण होते.अर्थात, आपल्या आरोग्यसेवा यंत्रणेमधील परिणामकारक सुधारणांच्या साथीने अशाप्रकारचे प्रगतीशील निर्णय घेतले गेले तर समाजाच्या अत्यंत असुरक्षित आणि वंचित गटापर्यंत दर्जेदार आरोग्यव्यवस्था पोहोचविण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करण्यातील आव्हाने आपल्याला समर्थपणे पेलता येतील. 
डॉउमा अलीएसआरसीसीमुंबईया जागतिक साथीमुळे आरोग्य सेवेबाबतचा आपला दृष्टीकोन बदलला आहेती अधिक प्रमाणात दूरस्थ आणि डिजिटाइज झाली आहे.आम्ही हे समजू शकतो कीडायलिसिस अद्यापही एक आव्हान आहे आणि दुर्गम ग्रामीण भागांमधील मोठ्या प्रमाणावरील रूग्णांसाठी ते सहज साध्य नाहीपीडीमुळे हे सोपे होतेइंटरनेट सुविधांची प्रगती आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यांच्या मुळे रिमोट पेशंट मॅनेजमेंट (आरपीएमशक्य झाले आहेत्याद्वारे आपण घरून पीडी घेणाऱ्या रूग्णाची स्थिती तपासू शकतो आणि आपण त्यांच्या आजारावर तसेच उपचारांवर रोज लक्ष ठेवू शकतोत्यामुळे त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आवश्यक असल्यास बदल करू शकतोत्यांच्या उपचारांची माहिती पाहू शकतो आणि काहीही समस्या आल्यास प्रोग्राम करण्यायोग्य चिन्हांनी आपल्याला त्याची सूचना मिळू शकते

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..