सैफ अली खान गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलरचा नवा चेहरा 

मुंबई२7 जुलै २०२१: पाच कोटींहून अधिक घरांच्या विश्वासाला पात्र ठरलेला भारतातील सर्वाधिक खपाचा हेअर कलर अशी ओळख मिळविणा-या गोदरेज एक्स्पर्ट इझीने आपल्या गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलरचा ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. हा शाम्पू हेअर कलर म्हणजे केस रंगविण्याची एक आधुनिक आणि सोयीस्कर पद्धत आहे. हा रंग कोरड्या केसांवर अगदी शाम्पूप्रमाणेच लावायचा असून पाच मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होते. सैफ अली खान यांच्याशी केलेल्या या सहयोगामुळे हे उत्पादन आणि शाम्पू हेअर कलर प्रकाराची माहिती लोकांमध्ये सर्वदूर पोहोचविण्यास मदत होणार आहे. गोदरेज एक्स्पर्ट इझीने सैफ यांची भूमिका असलेली एक नवी टीव्ही जाहिरातही प्रसारीत केली आहे. उत्पादनाची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यासाठी आणि शाम्पूचा हा प्रकार अधिक ठळकपणे लोकांच्या नजरेसमोर यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीची संकल्पना क्रिएटिव्हलँड एशियाची आहे.

आपल्या साध्या तरीही अभिजात शैलीसाठी प्रसिद्ध असलेला सैफ अली खान हा देशातील काही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे सहज वापरता येण्याजोग्या आणि ५ मिनिटांत झटपट काम करणा-या गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलरसाठी ही अगदी सुयोग्य निवड आहे. गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलर हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. यातील आवळा आणि शिकेकाईचे गुण केसांना पोषण देतात व पांढरे केस पूर्णपणे रंगण्याची हमी देतातपरिणामी हे लावल्याने केस खूपच मऊ बनतात.  

या सहयोगाबद्दल बोलताना सैफ अली खान म्हणाला, "गोदरेज एक्स्पर्ट हा भारतातील पहिला हेअर कलर ब्रॅण्ड आहे, ज्याने हेअर कलर्सचे अनेक प्रकार आपल्यासमोर आणले आहेत. माझ्याप्रमाणेच हा ब्रॅण्डसुद्धा सातत्याने नव्या सुधारण घडवून आणत असतोमग ते पावडर हेअर कलरपासून ते रीच क्रीम कलरसारखे उत्पादन असो किंवा आता बाजारात आणलेला ५ मिनिट शाम्पू हेअर कलर असो. साधे तरीही स्टायलिश राहण्याच्या माझ्या अंदाजाशी गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलर अगदी मिळताजुळता आहे. ५ मिनिटांत सहज आणि झटपट केस रंगविण्याची प्रक्रिया हे या उत्पादनातील माझे आवडते वैशिष्ट्य आहे.

या घोषणेबद्दल सांगताना गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडभारत आणि SAARC चे सीईओ सुनिल कटारिया म्हणाले, "गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलर म्हणजे हेअर कलर्सच्या श्रेणीमधील एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. या उत्पादनाद्वारे आम्ही वेळेची कमी असलेल्या आणि केस झटपट रंगविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी एक उपाय देऊ करत आहोत. केस रंगविण्याची संपूर्ण प्रक्रिया सुटसुटीत करण्याची आणि पाच मिनिटांत केसांना नवा लुक मिळवून देण्याची क्षमता यामुळे गोदरेज एक्स्पर्ट इझी हे एक अभिनव उत्पादन ठरले आहे. सैफ अली खान यांच्याबरोबर केलेल्या सहयोगामुळे आम्हाला या उत्पादनश्रेणीबद्दल ग्राहकांची जागरुकता वाढविता येईल त्याचबरोबर आमचे उत्पादन शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येईल."

गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलर्स हे सहज वापरता येण्याजोग्या आणि एकदाच वापरून संपणा-या सिंगल-यूज सॅशेमध्ये उपलब्ध आहेत. हा रंग कोरड्या केसांना लावासंपूर्ण आतपर्यंत चोळून पाच मिनिटांत धुवून टाका. गोदरेज एक्स्पर्ट इझी शाम्पू हेअर कलरचा एक पॅक रु. २९ इतक्या माफक किंमतीत उपलब्ध असून हा रंग संपूर्ण महिनाभर टिकतो. नॅचरल ब्लॅकनॅचरल ब्राउन आणि बर्गंडी या तीन रंगांमध्ये मिळतो. ही उत्पादने सर्व जनरल/मॉडर्न ट्रेड आणि ई-कॉमर्स मंचांवर उपलब्ध आहेत.

नव्या टीव्ही जाहिरातीसाठी लिंक: https://youtu.be/6A7927Cwg6o

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..