गोदरेज अप्लायन्सेस
‘गोदरेज अप्लायन्सेस’ने भारतीयांना दिला भांडी स्वच्छ करण्याचा एक उत्तम मार्ग, ‘डिशवॉशर’च्या उत्पादनामध्ये पदार्पण
· स्टीम वॉश, जंतूविरहीत यूव्ही-आयन तंत्रज्ञान आणि टर्बो ड्राय या पद्धतींनी गोदरेज डिशवॉशर्स करतात भांड्यांची उत्तम व आरोग्यदायी स्वच्छता; भारतीय स्वयंपाकघरे व भारतीय स्वयंपाक यांसाठी हा डिशवॉशर अगदी योग्य.
· डिशवॉशर्सची संपूर्ण श्रेणी सुरू करताना बाजारपेठेतील 15 टक्के वाटा प्राप्त करण्याचे कंपनीचे लक्ष्य.
मुंबई, 20 जुलै, 2021 : गोदरेज समुहातील गोदरेज ॲन्ड बॉइस या कंपनीचा घरगुती उपकरणांचा व्यवसाय असलेल्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’ने डिशवॉशरच्या उत्पादनामध्ये पदार्पण केले आहे. ‘गोदरेज इऑन डिशवॉशर्स’ ही नवीन श्रेणी सादर करीत असल्याची घोषणा ‘गोदरेज ॲन्ड बॉइस’तर्फे आज येथे करण्यात आली.
या नव्या उत्पादनाच्या सादरीकरणाविषयी बोलताना ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे व्यवसाय प्रमुख व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “कोरोना साथीने ग्राहकांच्या ताणतणावात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरांत राहणारे ग्राहक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. कार्यालयीन कामे घरातूनच करण्याची सक्ती असल्याने त्यांची दोन्हीकडे तारांबळ उडते. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मोलकरणींवर अवलंबून राहण्यावरही मर्यादा आली आहे. अशावेळी घरगुती कामांचा व्याप व श्रम कमी करण्याच्या उद्देशाने अनेकजण डिशवॉशर्सची खरेदी करू लागले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच आम्ही स्वतः आरोग्य, स्वच्छता आणि श्रम कमी करण्याच्या संकल्पनांसाठी विविध तंत्रज्ञानांवर काम करीत आहोत आणि डिशवॉशरचे उत्पादनही आम्ही याच अनुषंगाने सुरू केले आहे. घरांतील कामांमध्ये डिश, भांडी स्वच्छ करणे हे खरे तर खूप वेळखाऊ व कष्टदायक काम आहे. अशा वेळी स्वच्छता, सोयीस्करपणा आणि कार्यक्षमता हे गुणधर्म असलेले गोदरेज डिशवॉशर्स उत्तम प्रकारे भांडी स्वच्छ करतात. कोविडपश्चात काळातही ही डिशवॉशर्सची मागणी अशीच सुरू राहील, कारण दिवसेंदिवस अनेक ग्राहकांना आपल्या रोजच्या जगण्यात या उत्पादनाचे मोल पटलेले आहे.”
अनेक ठिकाणी डिशवॉशर्सविषयी गैरसमज आहेत. उदा. डिशवॉशरमधून भांड्यांची स्वच्छता चांगल्या प्रकारे होत नाही, काही विशिष्ट प्रकारचीच भांडी या मशीनमध्ये स्वच्छ होऊ शकतात, या मशीनमुळे पाण्याचा मोठाच अपव्यय होतो, वीजवापरही वाढतो, भांडी स्वच्छ होण्यास फार वेळ लागतो, इत्यादी. या सर्व गैरसमजांचे निराकरण नवीन ‘गोदरेज इऑन डिशवॉशर’ करते.
‘गोदरेज इऑन डिशवॉशर’ हे मशीन भारतीय स्वयंपाकघरांसाठी अगदी योग्य आहे. यामध्ये ‘12 प्लेस’ आणि ‘13 प्लेस’ अशी सेटिंग्स असून त्यांतून 91 भांडी आणि कटलरी धुतली जातात. मोठ्या आकाराचे प्रेशर कुकर, कढई, पॅन, तवा आणि इतर सर्व प्रकारची स्वयंपाकासाठी लागणारी भांडी या मशीनमध्ये व्यवस्थित धुतली जातात. महागडे डिनर सेट आणि नाजूक कप, ग्लास यांच्यासाठीही हे उपयुक्त आहे. टेफलॉनचे नॉन-स्टिक कूकवेअर, सिरॅमिक, मेलामाइन, सिलिकॉन आणि प्लास्टिकवेअर, अशी डिशवॉशरसाठी सुरक्षित अशी गणना झालेली भांडीदेखील यात चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात.
डिशवॉशरमध्ये पाण्याचा फार वापर होतो, असा एक समज आहे. यावर तोडगा म्हणून ‘गोदरेज’च्या सर्व डिशवॉशर्समध्ये इको मोड देण्यात आलेला आहे. तो ऊर्जा वाचवितो आणि एका वेळच्या धुण्यामध्ये अगदी कमी, म्हणजे 9 लिटर पाण्याचाच वापर करतो. भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकात तेल, मसाले मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यांचे डाग भांड्यांना पडतात. तेदेखील या मशीनमध्ये निघून जातात. गोदरेज ब्रॅंडची पर्यावरण रक्षणाशी मोठ्या प्रमाणात बांधिलकी आहे. तिचे पालन या उत्पादनात होते.
‘गोदरेज डिशवॉशर्स’मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत :
· भांड्यांवर असलेले विविध प्रकारचे डाग जात नसतील, तर त्याकरीता स्टीम वॉश हा चांगला उपाय आहे. भारतीय घरांमधील स्वयंपाकात अनेकदा भांड्यांवर तेला-तुपाचा चिकटपणा असतो, तसेच काही केल्या न जाणारे अन्नाचे डाग असतात. त्यांसाठी हा उपाय परिणामकारक ठरतो.
· अद्वितीय असे अतिनील तंत्रज्ञान भांड्यांवरील जीवाणूंना काढून टाकते आणि डिशेस जंतूविरहीत करते. यातील अंगभूत आयोनायझर निगेटिव्ह आयन वापरुन भांड्यांना असलेला विशिष्ट गंध काढून टाकते.
· स्मार्ट वॉश तंत्रज्ञान विशेष टर्बिडिटी सेन्सर प्रदान करते. पाण्यातील विविध अन्नकणांची मात्रा शोधून काढून त्यानुसार स्वच्छतेचे विविध मापदंड (तपमान, कालावधी, पाण्याचे प्रमाण, इ.) वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी भांडी चांगल्या प्रकारे धुतली जातात. पाण्याच्या जडपणानुसार मशीनमध्ये काही ॲडजेस्टमेंट करता येतात.
· डायरेक्ट वॉश फंक्शनमुळे ग्लास / फीडिंग बाटल्या यांसारख्या अरुंद तोंडाच्या बाटल्या चांगल्या पद्धतीने धुतल्या जातात. पॅन, कूकर यांसारखी भांडी धुण्याकरीता मशीनच्या मागील बाजूस 2 अतिरिक्त स्प्रे देण्यात आले आहेत. ट्रिपल वॉश फंक्शनमुळे ते कार्यान्वित होतात.
· डिशवॉशरमधून वाफ काढून टाकण्यासाठी आणि भांडी पूर्ण कोरडी होण्यासाठी एक शक्तीशाली पंखा या मशीनमध्ये बसविण्यात आला आहे. स्पेशल टर्बो ड्रायिंग तंत्रज्ञानामुळे तो कार्यान्वित होतो. अतिशय चिकट झालेल्या भांड्यासाठी इन्टेन्सिव्ह 65 डिग्री वॉश प्रोग्रॅम या मशीनमध्ये आहे. या तंत्रज्ञानांमुळे ग्राहकांना मशीनमधून भांडी बाहेर काढल्यावर ती पुसत बसावी लागत नाहीत किंवा ती वाळण्याची वाट पाहावी लागत नाही. डिशवॉशरमधून भांडी काढल्यावर ती कोरडी, गरम आणि अगदी स्वच्छ असल्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता येतो.
· ऑटो डोअर ओपन या वैशिष्ट्यामुळे ड्रायिंगच्या वेळी मशीनचा दरवाजा आपोआप किंचित उघडला जातो. त्यामुळे डिशेस सुकविण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कमी लागते आणि सुकण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते.
· कार्यक्षम ‘बीएलडीसी इनव्हर्टर’ तंत्रज्ञानामुळे गोदरेज इऑन डिशवॉशरमध्ये पाणी व वेळेची बचत होते. तसेच कमी ऊर्जा वापरून भांड्यांची स्वच्छता होऊन ती कोरडी होण्याची प्रक्रियाही चांगली होते. याकरीता या डिशवॉशरला युरोपीयन मानकांनुसार सर्वोच्च स्तरावरचे ए+++ हे ऊर्जा मानांकन देण्यात आलेले आहे.
2026 या आर्थिक वर्षापर्यंत भारतीय डिशवॉशर बाजाराची उलाढाल 90 दशलक्ष डॉलर (667 कोटी रुपये) इतकी होण्याची अपेक्षा आहे.
‘गोदरेज अप्लायन्सेस’चे प्रॉडक्ट ग्रूप बेड – डिशवॉशर्स, राजिंदर कौल म्हणाले, “भारतात डिशवॉशर ही श्रेणी अजूनही नवख्या स्तरावर आहे. कोविड-19च्या साथीमुळे वैयक्तिक स्वच्छता आणि सोयीस्करपणाची तीव्र गरज वाढली. त्यातून या उत्पादनाविषयीची जागरूकता वाढून तिच्या मागणीला वेग आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये, आम्ही केवळ निवडक शहरांसाठी अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवीन ‘गोदरेज इऑन डिशवॉशर’ श्रेणी सुरू केली. आता ही संपूर्ण श्रेणी भारतभर ऑफलाइन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आमच्या उत्कृष्ट मूल्यप्रस्तावामुळे, आम्ही या आर्थिक वर्षात बाजारपेठेत 15 टक्के हिस्सा मिळविण्याचा विश्वास बाळगून आहोत.”
‘गोदरेज इऑन डिशवॉशर’चा आतील दरवाजा व टब हे भाग स्टेनलेस-स्टीलने बनविलेले असल्यामुळे या डिशवॉशरमध्ये मोठ्या प्रमाणात टिकाऊपणा आलेला आहे. या मशीनला 2 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी देण्यात आली आहे. 13 प्लेस व 12 प्लेस अशा सेटिंग्जच्या स्वरुपात नवीन ‘गोदरेज इऑन डिशवॉशर्स’ उपलब्ध असून त्यांची प्रारंभिक किंमत 37,900 रुपये + कर इतकी आहे.
Comments
Post a Comment