डॉक्टर डॉनमध्ये साजरा होणार डॉलीबाईंचा वाढदिवस...

झी युवा वाहिनीवरच्या डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये सध्या देवा आणि डॉलीबाई यांच्या प्रेमाचे जोरदार वारे वाहतायत. देवा आणि डॉ मोनिका यांच्या नव्याने सुरु झालेल्या या प्रेमाची कहाणी सध्या भेटीगाठी, विविध सरप्राईजेस आणि आनंदाने बहरत चाललीये आणि आता यामध्ये आणखी एका आनंदाची भर पडतेय ज्याचं निमित्त ठरणारे देवाच्या लाडक्या डॉलीबाई म्हणजेच डॉ मोनिका यांचा वाढदिवस.

डॉलीबाईंचा वाढदिवस हा देवासाठी खास यात तो अधिक खास बनवण्यासाठी देवाने त्याच्या पंटर गॅन्गसोबत सर्वांनाच कामाला लावलंय. वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनसाठी खास थीमही ठरवली गेलीये आणि ही थीम आहे अंडरवर्ल्डची दुनिया. यानुसार सर्वांनीच आपापले कॅरेक्टर्स ठरवलेत आणि तसे पोशाखही घातलेत. देवा, कबीर, राधा सगळेत यात सहभागी झालेत त्यामुळे डॉलीबाईही खुप खुश होतात. पण देवा आणि डॉ मोनिका यांच्या या प्रेमाला विरोध असणाऱ्या राधाच्या मात्र डोक्यात वेगळीच चक्र फिरतायत आणि त्यानुसार ती या थीम पार्टीमध्येही मोडता घालायचा प्रयत्न करतेय.

राधाच्या या नाराजीच्या सुराने डॉ मोनिका यांच्या वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये नवे विघ्न येणार नाही ना. देवा त्याच्या आयुष्याचे कटू सत्य डॉ मोनिका यांना सांगणार का, काय असणार यांच्या या प्रेमाचे भवितव्य असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतायत. ज्याची उत्तरं तुम्हाला मालिकेच्या आगामी भागामधून मिळतील तेव्हा पहात रहा डॉक्टर डॉन ही मालिका रोज रात्री नऊ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO