दुस-या कोरिया-भारत मैत्री प्रश्नमंजुषेला विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद.

कोरोना संकट काळातही २० शाळांमधील १००९३ विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग.

विजेत्या विद्यार्थीनीला कोरियाची मोफत सफर.

मुंबईदि. २३ सप्टेंबर.

भारत कोरिया मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा द्वितीयला विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असून कोरोना महामारी असतानाही या स्पर्धेसाठी तब्बल २० शाळांमधील १००९३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेती मुंबईच्या चांदीवलीची विदयार्थी अनाश्रुता गांगुली ही ला कोरियाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. भारतातील कोरियन सांस्कृतिक केंद्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

कोरियाचे मुंबईतील काउंसील जनरल किम डोंग हे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले कीअशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या प्रश्नोत्तर स्पर्धेतून भारतीय विद्यार्थ्यांना कोरियाची संस्कृती व सभ्यता जाणून घेण्याची संधी मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा घेण्यात आली. 

कोरिया-भारत जोडण्याचा प्रयत्न...

या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा भारत आणि कोरिया यांच्यातील मैत्री दृढ करणे असून भारतीय विद्यार्थ्यांना कोरियाच्या महान संस्कृती व सभ्यतेचा परिचय करुन देणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी कोरिया बद्दलची विस्तृत माहिती दिली. 

अनाश्रुताला मिळाला कोरिया सहलीचा मान.

चांदिवलीच्या पवार पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी अनाश्रुता गांगुली ही या स्पर्धेत प्रथम आली असून तीला ६ दिवस ५ रात्रीच्या मोफत कोरिया सहलीची संधी मिळणार आहे तर इतर १४ विजेत्यांना ३९ हजार रुपयांचा रोख बक्षीसं मिळाली आहेत.

या स्पर्धेआधी कोरियाच्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती नव्हती पण स्पर्धेमुळे कोरियन संस्कृती समृद्ध व गौरवशाली असल्याचे समजले असे अनाश्रुता म्हणाली. मला खूप आनंद झाला असून हा अनुभव मी शब्दात व्यक्त करु शकत नाही असेही अनाश्रुती म्हणाली. कोरियाला भेट देण्याबद्दल अनाश्रुता खूपच उत्साही असून या भेटीने कोरियाची आणखी जवळून ओळख होण्यास मदत होईल असे ती म्हणाली.

खार पश्चिम येथील जसुदबेन एमएल स्कूलची विद्यार्थ्यांनी तारिणी पिडिया हिला १० हजार रुपयांचे दुसरे बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेत भाग घेणे हा वेगळाच अनुभव होता. या स्पर्धेमुळे कोरियाबद्दल जवळून माहिती मिळाली. कोरिया आणि भारताचे संबंध मजबूत आहेत हे समजले असून कोरियन भाषा शिकण्याची यातून प्रेरणा मिळालीअसे ती म्हणाली.

 

यासंदर्भातील अधिक माहितीसाठी श्री. नवीन शर्मा ०९८१००८६०४० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा अथवा ns@athenaventures.in या ईमेल वर संपर्क करावा

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार