अमेझॉन प्राईम व्हिडिओ

अमेझॉन प्राईम व्हिडिओने दोन भारतीय नॉमिनेशन्ससोबत 2020च्या  इंटरनेशनल एमी अवार्ड्समध्ये पटकावले स्थान !

आपल्या आकर्षक कंटेंटने आपली वैश्विक ओळख निर्माण करत, अमेझॉन प्राईम व्हिडिओला आज प्रतिष्ठित अशा 2020 इंटरनेशनल एमी® अवार्ड्समधील दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. एकीकडे, प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित अमेझॉन ओरिजिनल सीरीज ‘फोर मोर शॉट्स प्लीज़!’ने सर्वश्रेष्ठ कॉमेडी सीरीज श्रेणीमध्ये नामांकन प्राप्त केले असून अभिनेता अर्जुन माथुरला ‘टाइगर बेबी’ आणि एक्सेल मीडिया एंड एंटरटेनमेंटद्वारे निर्मित अमेझॉन ओरिजिनल सीरीज़ ‘मेड इन हेवन’ मधील आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी ‘बेस्ट परफॉर्मन्स’च्या श्रेणीत नामांकित करण्यात आले आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या भारतीय ओरीजीनल प्रमुख, अपर्णा पुरोहित यांनी म्हटले की, “ही अभिमान आणि सन्मानाची गोष्ट आहे की आमच्या भारतीय ओरीजीनल्सने प्रतिष्ठित अंतर्राष्ट्रीय एमी नामांकन मिळवत मान्यता प्राप्त केली आहे. आमचा नेहमीच अशातऱ्हेची कथानके बनवण्याचा प्रयत्न असतो जो स्थानीक असेल, मात्र भौगोलिक, राष्ट्रीय आणि जातीयतेच्या सर्व सीमांना पार करणारा असेल आणि हे नामांकन याचा पुरावा आहे की आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्ही या नामांकनांमुळे रोमांचित झालो आहोत आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स, टाइगर बेबी आणि एक्सेल मीडिया एंड एंटरटेनमेंट सोबत हा क्षण साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.”
प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित, ‘फोर मोर शॉट्स प्लीज़!’ सर्वश्रेष्ठ हास्य श्रृंखला श्रेणीमध्ये निवडण्यात आलेली एकमेव भारतीय टाइटल असून अभिनेता अर्जुन माथुर देखील या ‘सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’च्या श्रेणीत एकमेव भारतीय आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडिओ सलग तीन वर्ष अंतर्राष्ट्रीय एमी नामांकनचा भाग राहिला आहे, जिथे अमेझॉन ओरिजिनल सीरीज ‘इनसाइड एज’ला 2018 मध्ये बेस्ट ड्रामा सीरीज करीता नामांकित करण्यात आले होते आणि या मंचावरची पहिली अनस्क्रिप्टेड ऑरिजिनल सीरीज ‘द रीमिक्स’ला 2019मध्ये सर्वश्रेष्ठ नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट अवार्डसाठी नामांकन प्राप्त झाले होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight