रमा करू शकेल का आपल्या सौभाग्यच रक्षण ? 

मुंबई २३ सप्टेंबर, २०२० : स्वामिनी मालिका आता रंजक वळणावर येऊ पोहचली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडात, आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आणि शनिवारवाड्यात आल्या... शनिवार वाड्यातील रमाबाईंचा प्रवास तसा कठीणच... रमाबाईंच्या साथीला पार्वतीबाई, नानासाहेब आहेतच... पण गोपिकाबाईंसोबतच आता त्यांना माधवरावांचे देखील मन जिंकायचे आहे ... या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरी जावे लागले, आणि अजूनही जावे लागते आहे... त्यांच्यासमोर आलेल्या अनेक कठीण प्रसंगामधून आजवर रमाबाई नेहेमीच बाहेर पडल्या... माधवरावांचा अबोला, गोपिकाबाईंची नाराजगी आणि आनंदीबाईंची कट कारस्थान ज्याविषयी रमाबाई अनभिज्ञ आहेत, पण कधी पार्वतीबाई तर कधी सावित्रबाईंच्या मदतीने आजवर रमाबाईंनी यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला... आणि यामध्येच आता रमाबाईंची सगळयात मोठी कसोटी लागणार आहे... माधवरावांवर अचानक हल्ला होणार असून रमाबाई माधवरावांना कश्या वाचवतील ? त्या आपल्या सौभाग्याच रक्षण कसे करतील ? हे बघणे रंजक असणार आहे... या प्रसंगानंतर रमाबाई – माधवराव यांच्यातील दुरावा मिटेल ? गोपिकाबाईंचे मन रमाबाई जिंकू शकतील ? हे लवकरच कळेल... तेंव्हा नक्की बघा स्वामिनी मालिका सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

                          माधवरावांच्या मनामध्ये असलेले रमाबाईबद्दलच्या भावना ते व्यक्त करू शकतील का ? या घटनेनंतर गोपिकाबाई आणि रमाबाई यांचे नाते कोणते वळण घेईल ? माधवराव रमाबाईं यांच्यात प्रेम फुलेल का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा स्वामिनी मालिका कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight