“कवासाकी जेन्युइन ऑइल”साठी आयडेमिट्स्यु ल्यूबची कवासाकी सोबत भागीदारी
17th डिसेंबर 2020, नवी दिल्ली: भारतामधल्या ल्युब्रिकंट्सच्या आघाडीच्या निर्माता आणि पुरवठादारांपैकी एक म्हणून गणना होणा-या जपानमध्ये मुख्यालय असलेल्या आयडेमिट्स्युने भारतीय कवासाकी मोटर्ससोबत आपल्या भागीदाराची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे भारतीय भारतातील सर्व कवासाकी मोटरसायकलसाठी संशोधन आणि चाचणी केलेल्या कवासाकी जेन्युइन ऑइलची निर्मिती करता येईल.
कवासाकी मोटरसायकल प्रा.लि.चे भारतातले व्यवस्थापकीय संचालक श्री नाओकी माट्सूमोटो म्हणाले की दोन प्रख्यात जपानी ब्रॅंड्सनी हातमिळवणी करण्याची आणि आपली निपुणता दाखवण्याची ही एक नामी संधी आहे. आम्ही पुन:शाश्वती तसेच जागतीक दर्जाच्या सूपरबाइक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी किंवा इंजिनियरींगसह ग्राहकांच्या सर्वोत्तम अनुभूतीवर लक्ष केंद्रित करतो.
या भागीदारीच्या प्रसंगी आयडेमिट्स्यु ल्यूब इंडियाचे उपाध्यक्ष संजीव प्रधान म्हणाले,”भारतात पहिल्यांदाच उच्च दर्जाच्या कवासाकी जेन्युइन ऑइलचा परिचय करुन देण्यासाठी कवासाकी इंडियासोबत सहयोग करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे, आयडेमिट्स्युने पाताळगंगा, महाराष्ट्र येथील अद्ययावत सुविधेमध्ये आधीच केजीओ (कवासाकी जेन्युइन ऑइल)ची निर्मिती सुरू केली आहे. आम्ही सर्व स्टेकहोल्डर्ससाठी हितावह स्थिती निर्माणाचे, म्हणजेच सर्व डिलर्सना उच्च दर्जाच्या उत्पादन आणि सेवाक्षमतेचे त्याचप्रमाणे ग्राहकांना रायडिंगचा अधिक चांगला अनुभव देण्याच्या प्रभावी प्रोत्साहनाच्या शाश्वतीचे नियोजन करत आहोत.
आयडेमिट्स्यु, या जपानच्या महत्वपूर्ण ल्युब्रिकंट निर्माता कंपनीने कवासाकीच्या सहयोगाने संयुक्तपणे केजीओ विकसीत केले आहे ज्यामुळे कवासाकी मोटरसायकलची आवश्यकता पूर्ण करता येईल.
कवासाकी फुल सिंथेटिक 10W-40MA उच्च दर्जाचे बेसऑइल आणि ऍडिविटिव्ह्जसह विकसीत करण्यात आले आहे, जे सर्वोत्तम इंजिन प्रदर्शनाचे समर्थन करते त्याचप्रमाणे स्मुद गियर शिफ्ट, फुल थ्रोटल आणि अगदी तीव्र ड्रायव्हिंग स्थितींमध्ये देखील सुधारीत इंजिन सुरक्षेसारख्या महत्वपूर्ण गुणविशेषांमुळे प्रत्येक कवासाकी ग्राहकाच्या उत्कृष्ठ रायडिंग अनुभूतीची शाश्वती देते.
केजीओच्या परिचयासह, उत्पादन प्रमोशन, सुरळीत डिलिव्हरी तसेच सुधारीत सेवा अनुभव देण्यात उत्तम सहाय्य करण्यासाठी आयडेमिट्स्यु भारतातील कवासाकी मोटर्सच्या अधिकृत विक्रेत्यांशी सहयोग करेल.
Comments
Post a Comment