ब्ल्यू डार्टचे डिजिटल उपक्रम यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनी ‘हरित’ होणार!

समूहाच्या नव्या शाश्वतता वाटचालीला अनुसरून पेपरलेस व्यवहार सुरू करणार

भारत/मुंबई7 जून२०२१: डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुपचा (डीपीडीएचएलभाग असलेल्या ब्ल्यू डार्ट या दक्षिण आशियातील प्रीमिअर एक्स्प्रेस हवाई आणि इंटिग्रेटेड वाहतूक व वितरण कंपनीतर्फे ५ जून २०२१ या जागतिक पर्यावरण दिनापासून आपल्या सर्व व्हेंडर्ससाठी त्यांच्या नव्या डिजिटल पोर्टलवर पेपरलेस व्यवहार सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आलेया पेपरलेस तंत्रज्ञानाच्या ऑनलाइन लाँचच्या इव्हेंटची जागतिक पर्यावरण दिनाच्या यूएनईपीच्या समारंभांमध्ये नोंदणी करण्यात आली आहेग्रुपच्या नव्या शाश्वत वाटचालीअंतर्गत ब्ल्यू डार्टने भविष्य-सज्ज तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहेज्यायोगे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि त्याच वेळी शाश्वत मार्गाने उत्तम प्रकारे डिलिव्हरी करता येईल.

संयुक्त राष्ट्रांनी  २०२१-२०३० ही दहा वर्षेपरिसंस्था पूर्ववत करण्यासाठीचे दशक म्हणून घोषित केली आहेतसंयुक्त प्रयत्नकार्यक्षम जोखीम नियंत्रण धोरणे आणि स्रोतांचा शाश्वत वापर करून परिसंस्था पुनःस्थापित केल्यामुळे पर्यावरणसामाजिक आणि गव्हर्नन्स (ESG) निकषांचा विचार करता अनेक व्यवसायसंधी निर्माण होतीलअशी अपेक्षा आहेपरिसंस्था पुनःस्थापित करण्यासाठी ब्ल्यू डार्ट  या दशकात प्रयत्न करण्यास प्रतिबद्ध आहे.

वातावरणबदलाशी लढा देण्याचे महत्त्व ब्ल्यू डार्टने जाणले आहे आणि या परिसंस्था पुनःस्थापित करण्याच्या दशकामध्ये भक्कम ईएसजी यंत्रणेची सांगड घालणार आहेब्ल्यू डार्टने आपल्या ५०हून अधिक ग्राहकांच्या इन्व्हॉइसेसची प्रक्रिया ऑनलाइन पार पाडली आणि हे प्रमाण १००पर्यंत नेण्यासाठी ब्ल्यू डार्ट प्रयत्न करत आहेकागदनिर्मिती करण्यासाठी भरपूर उर्जा खर्च होतेएका A4 कागदाच्या निर्मितीसाठी ५० वॉट तास लागतातपेपरलेस झाल्यामुळे उर्जाबचत होईलकार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईलनिर्वनीकरण टाळले जाईलनैसर्गिक अधिवासाचे संरक्षण होईल आणि त्या परिसरातील लोकांसाठी जंगलावर आधारीत उदरनिर्वाहाच्या संधी प्राप्त होतीलया उपक्रमाच्या माध्यमातून ब्ल्यू डार्ट पर्यावरणाचे संरक्षण करेलत्याचप्रमाणे दर वर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासाठी ब्ल्यू डार्ट प्रयत्नशील असेलसध्याप्रतिवर्षी २२,२०,००० किलो कार्बनचा प्रतितोल साध्य (ऑफसेटकरण्यासाठी ब्ल्यू डार्टतर्फे दर वर्षी १११,००० झाडे लावण्यात येतात.

ब्ल्यू डार्टचे, मॅनेजिंग डायरेक्टर , बॅल्फोर मॅन्युएल म्हणाले, “आमची संस्था ही उद्दिष्टांवर चालणारी संस्था आहे आणि शाश्वतता व जबाबदारी घेऊन जगणे हे आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहेशाश्वत व्यवसाय कार्य पद्धती समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्याच वेळी नावीन्यतेतील मापदंड उंचावण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न म्हणजे हा उपक्रम आहे.  ब्ल्यू डार्ट हे मार्केट लीडर आहेत आणि आमचा विश्वास आहे कीआमच्या शाश्वततेच्या वाटचालीवर आम्ही पावले टाकत राहिलो तर भारताच्या आणि जगभरातील वातावरण बदलाच्या समस्या कमी करण्यात आम्ही योगदान देऊ शकूतापमानवाढीच्या परिस्थितीमध्ये भविष्यात बदल घडवून आणण्यासाठी जगातील मोठ्या संस्था आणि उद्योगसमूहांनाच प्रयत्न करावे लागणार आहेतहे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ब्ल्यू डार्ट अनेक पावले उचलली असून याचा मला सार्थ अभिमान आहे.”

ब्ल्यू डार्टचे सीएफओ अनील गंभीर म्हणाले, “ईएसजीचे अनुपालन करणारी संस्था म्हणून प्रवास करताना व्यवसायिक कामकाज करण्याचे शाश्वत मार्ग आम्ही निश्चित केले आहेतज्या समाजामध्ये आम्ही काम करतो त्या समाजाची परतफेड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि त्याच वेळी आपले पर्यावरण पुनःस्थापित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलतोमहामारी आणि वातावरण बदलाची समस्या एकत्रितपणे आले असून फार उशीर होण्यापूर्वी परिसंस्थेमध्ये संस्थांनी गुंतवणूक करण्याची तातडीची गरज आहे.”

डीपीडीएचएलचा एक भाग म्हणूनब्ल्यू डार्टच्या नव्या शाश्वतता वाटचालीअंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी क्लीन (पर्यावरणस्नेहीकामकाजसर्वांसाठी काम करण्यासाठीची एक उत्तम कंपनीत्याचप्रमाणे अत्यंत विश्वासार्ह कंपनी घडविण्याचा प्रयत्न असेलवातावरण बदल आणि जागतिक तापमानवाढ या समस्यांविरोधात जगभरातून देण्यात येणाऱ्या लढ्याला हातभार लावण्यासाठी या एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स पुरवठादारातर्फे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत२०२५ सालापर्यंत ब्ल्यू डार्टच्या मालकीच्या किंवा लीझवर असलेल्या सुविधांचे कामकाज नेट झीरो कार्बन व्यवस्थेमध्ये व्हावे हे कंपनीचे उद्दिष्ट आहेअधिक कार्यक्षमतेला चालना देणे आणि आपल्या ताफ्यातील ६ बोईंग ७५७ फ्रेटर्समध्ये पर्यावरणस्नेही (किमान हरित वायू उत्सर्जन करणारेइंधन वापरणेग्राहकांना शाश्वत आणि इष्टतम पॅकेजिंग सोल्युशन्स उपलब्ध करून देणे आणि सर्वसमावेशक सोल्यूशन्सच्या माध्यातून हरित उत्पादनांचे आणि सेवांचे डिझाइन करणे या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

लोकांना जोडणेजगण्यात सुधारणा करणे या घोषणांच्या अंतर्गत ब्ल्यू डार्टने ‘गो प्रोग्रॅम्स’ सुरू केले आहेतज्यात तीन मुख्य पैलूंचा समावेश करण्यात आला आहेयात GoTeach (शिक्षणात उत्कृष्टता साध्य करणे), GoGreen (पर्यावरण संरक्षणआणि GoHelp (आपत्ती व्यवस्थापन प्रतिसादया तीन उपक्रमांचा समावेश असून या तीनही उपक्रमांमुळे समाजावर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत आहेगरीबी निर्मूलनपृथ्वीचे संरक्षण आणि २०३० पर्यंत सर्वांना शांततेने व समृद्धीने जगता यावे याची खातरजमा करणे या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांना हे उपक्रम सुसंगत आहेत.

डीपीडीएचएल गोल मिशन २०५० अंतर्गत ‘२०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन’ साध्य करणे हे ब्ल्यू डार्टचे उद्दिष्ट आहेया अंतर्गत जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सिअसने कमी करणे हे ब्रँडचे ध्येय आहेआपल्या व्यवसाय शून्य उत्सर्जन लॉजिस्टिक्सच्या तत्वावर चालविण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने ब्ल्यू डार्टची वाटचाल सुरू आहे आणि एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी मापदंड निश्चित करून जगाला मदत करण्यात योगदान देण्यासाठी ब्ल्यू डार्ट प्रयत्नशील आहेमिशन २०५० उपक्रमांतर्गत गेल्या चार वर्षांमध्ये ब्ल्यू डार्टने डीपीडीएचएलच्या एका वर्षात दहा लाख झाडे लावण्याच्या लक्ष्यामध्ये १०%हून अधिक योगदान दिले आहेत्याचप्रमाणे डिसेंबर २०११ मध्ये ब्ल्यू डार्टने भारतातील आंतरराष्ट्रीय व स्थानिक बाजारपेठांसाठी गोग्रीन कार्बन न्यूट्रल सर्व्हिस सुरू केली आहेही भारतातील अशा प्रकारची पहिलीच सेवा आहेया सेवेला २०२० पर्यंत पर्यावरणाची जाणीव असलेल्या २,८७१ ग्राहकांनी सबस्क्राइब केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार