अमृतांजन हेल्थकेअर

महिलांचे मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छता राखण्याचे
अमृतांजन हेल्थकेअरच्या कॉम्फीचे उद्दिष्ट

»        उच्च दर्जाचे, परवडणारे आणि सर्वांना उपलब्ध होणारे सोल्यूशन

»        ब्रॅंडतर्फे मल्टी-मीडिया मोहीम सुरूमोहिमेतील जाहिरातीत श्रद्धा कपूर यांच्यातर्फेकापडाच्या तुलनेत सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर व फायदे यांविषयी जनजागृती

यूट्यूब लिंक https://youtu.be/BGgva-lV0JM

मुंबई, 8 June 2021 : अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड (अमृतांजन हेल्थकेअर) या कंपनीच्या कॉम्फी स्नग फिट या ब्रॅंडने, परवडणारी आणि उच्च दर्जाची सॅनिटरी नॅपकिन्स पुरवून उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या आधारे महिलांच्या स्वच्छतेच्या बाजारपेठेत एक नवीन आशा निर्माण केली आहे. कॉम्फी स्नग फिट हा महिलांच्या मासिक पाळीच्या स्वच्छतेसंदर्भातील वेगाने वाढणारा ब्रॅंड म्हणून उदयास आला आहे. मासिक पाळीच्या काळात कापडाचा वापर करणाऱ्या महिलांना स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देण्याचे या ब्रॅंडचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने, कापडापेक्षा सॅनिटरी नॅपकिन वापरणे किती स्वच्छ व आरोग्यदायी असतेयाविषयी महिलांना जागृत करण्यासाठी जनजागृती मोहीम या ब्रॅंडतर्फे चालविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रख्यात चित्रपट अभिनेत्री श्रद्धा कपूर सहभागी झाल्या आहेत.

विविध अभ्यासातून असे दिसून आले आहेकी भारतातील मासिक पाळी येत असणाऱ्या 35.5 कोटी स्त्रियांपैकी जवळजवळ एक तृतीयांश जणी मासिक पाळीच्या व्यवस्थापनासाठी फक्त कापड वापरतात. मासिक पाळी येत असणाऱ्या मुलींपैकी केवळ 38 टक्के जणी आपल्या आईशी पाळीविषयी बोलतात. मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनाच्या योग्य सुविधा नसल्यामुळे दरवर्षी सुमारे 2.3 कोटी मुली शाळेत जाणे सोडून देतात. मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावामुळे देशातील महिलांसमोर आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरवर्षी भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या मृत्यूची जवळजवळ 60 हजार प्रकरणे नोंदविली जातातत्यातील दोन तृतीयांश महिला मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावामुऴे मृत्यू पावलेल्या असतात. उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांच्या उपलब्धतेचा अभाव आणि मोठ्या किंमती हे मासिक पाळीचे आरोग्य मिळविण्यातील मुख्य अडथळे आहेत.

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. शंभू प्रसाद या संदर्भात म्हणाले, "महिलांचे मासिक पाळीचे आरोग्य व स्वच्छता यांविषयी जागरूकता आणि शिक्षणाची पातळी खूप कमी आहे आणि अजूनही आपल्या देशातील प्रमुख भागांमध्ये मासिक पाळी हा एक कलंक मानला जातो. एका विशिष्ट हेतूने चालविण्यात येणारी कंपनी या नात्यानेभारतातील महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही एक मोहीम सादर करीत आहोत. देशातील या मोठ्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्याचेतसेच परवडणाऱ्या किंमतींत आरोग्यदायीउच्च गुणवत्ता असलेले उत्पादन देण्याचे आमचे अमृतांजन हेल्थकेअरमध्ये लक्ष्य आहे. या उद्दिष्टातून आम्ही आमचा कॉम्फी स्नग फिट ब्रँड आणखी मजबूत करू. ग्रामीण व उर्वरित शहरी बाजारपेठांमध्ये आमचे वितरणाचे मजबूत जाळे आहे. त्यातून हे उत्पादन सहजपणे उपलब्ध होईलयाची खात्री आम्ही देतो. गेल्या पाच वर्षात कॉम्फीची वाढ 5 पटींनी झाली आहे आणि येत्या 2-3 वर्षांत अव्वल तीन ब्रॅंड्समध्ये आमचा समावेश व्हावाअशी आमची महत्त्वाकांक्षा आहे."

अमृतांजनने नॅपकिनची प्रारंभिक किंमत 20 रु. इतकी ठेवली आहे. समाजातील मोठ्या घटकाला परवडेल अशा किंमतीत उच्च दर्जाचे नॅपकिन सादर करणारी अमृतांजन ही पहिली कंपनी होती. अमृतांजन हेल्थकेअरने चांगले तंत्रज्ञान मिळविण्यासाठी टीझेडएमओ युरोपबरोबर भागीदारी केलीतसेच उत्तर अमेरिकेतल्या लगद्यापासून नॅपकिन तयार केले. याव्यतिरिक्तकंपनीने तांत्रिक माहितीसाठी इस्त्राईलमधील एका तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेतली. यातून कंपनी उत्कृष्ट उत्पादन विकसीत करू शकली. भारतातील इतर ब्रॅंड्सपेक्षा कॉम्फीमध्ये शोषून घेण्याची क्षमता 80 टक्के अधिक आहे.

मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी हा ब्रँड एक नवीन जाहिरात सादर करणार आहे. टीव्हीडिजिटल आणि इन-स्टोअरसह अनेक माध्यमांद्वारे विविध प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात सादर करण्यात येईल.

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी मणि भगवतेश्वरन म्हणाले, ग्रामीण भारतातील सुमारे 2 ते 3 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरताततर उर्वरित बहुसंख्य स्त्रिया कपड्यावर अवलंबून असतात. त्यांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याच्या फायद्यांविषयी शिक्षित करणे हे आमच्या नवीन जाहिरातीचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या स्वच्छताविषयक उपायांसाठी कार्य करणारा एक ब्रॅंड असल्यानेश्रद्धा कपूर यांना आमच्या पहिल्या ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर आम्ही नेमले आहे. त्या अत्यंत लोकप्रिय आहेत आणि लक्ष्यित प्रेक्षकांशी त्या लगेच जोडल्या जातात. आपल्या मनाला भिडणाऱ्या विषयांवर त्या निर्भीडपणे मत व्यक्त करीत असतात. त्यामुळेच ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून त्यांच्या भूमिकेत सत्यता आणि विश्वासार्हता असणार आहे. त्यांच्यासोबत दीर्घ व समाधानकारक भागीदारी राहीलअशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.

या उपक्रमावर भाष्य करताना श्रद्धा कपूर म्हणाल्या, “अमृतांजन हेल्थकेअरच्या कॉम्फी स्नग फिट सॅनिटरी नॅपकिन्सच्या श्रेणीसाठी भागीदारी करण्यास मला खूप आनंद आहे. देशभरातील महिलांना स्त्री स्वच्छताविषयक उपाय देण्याचा आणि या विषयाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. एक महिला म्हणूनमी नेहमीच मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या कारणास सक्रियपणे समर्थन दिले आहे. भारतात पाळीविषयी बोलणे अजूनही निषिद्ध मानले जाते. काही अहवालांनुसार, अनेक मुली पाळी येण्यास सुरुवात झाल्यावर शाळा सोडून देतात. देशातील अनेक भागांत, कपड्यांचा वापर  करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे मुलींचे आरोग्य बिघडते. कापड वापरणे हे अस्वस्थ करणारे असतेचत्याशिवाय कपड्यांमुळे जंतूसंसर्गाची शक्यताही जास्त असते. मी मुलींना कॉम्फी सॅनिटरी नॅपकिनसारख्या अधिक सुरक्षितउत्तम स्वच्छता राखणाऱ्याआरोग्यदायी उत्पादनाचा वापर करण्याची विनंती करते. 127 वर्षांपासून लोकांच्या आयुष्याची काळजी घेणाऱ्यात्यांच्यावर उपचार करणाऱ्या आणि त्यांच्या मनास भावणाऱ्या अमृतांजन हेल्थकेअर कंपनीच्या एका ब्रॅंडशी जोडली जाऊनराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याची संधी मला मिळालीयाबद्दल मी खूष आहे.

आरके स्वामी बीबीडीओ यांनी संकल्पित केलेल्या या मोहिमेचे एक अनोखे आणि माहिती देणारे जाहिरात कथानक आहे. या जाहिरातीमध्ये श्रद्धा कपूर एका गावात चित्रीकरण करताना दिसू शकते.  एका शॉटच्या शेवटी एक तरूण मुलगी काही भाष्य करते. त्यानंतर श्रद्धा व ही मुलगी यांच्यात संभाषण सुरू होते. ही तरूणी महाविद्यालयात जाण्याची तयारी करत आहे; परंतु महिन्याचा तो काळ’ येण्याची तिला धास्ती आहेअसे ती श्रद्धाला सांगते. श्रद्धा कपूर त्या मुलीची समजूत घालते आणि आपल्या बॅगमधून तिला कॉम्फी स्नग फिट सॅनिटरी नॅपकिनचे एक पॅकेट देते. सुरुवातीला ती मुलगी ते पॅकेट घेण्यास कचरते; मात्र नंतर त्या पॅकेटवरील किंमतीचा शिक्का पाहून ती  मुलगी आणि तिच्या पाठीमागे उभी असलेली तिची आई या दोघी आनंदाने स्मितहास्य करतात. कोरडेपणा व आरामदायक अनुभवाची खात्री देणाऱ्या या नॅपकिन्समधील तंत्रज्ञानाची इन्फोग्राफिक देत या जाहिरातीचा समारोप होतो.

या जाहिरातीविषयी माहिती देताना नवनीत विर्क, क्रिएटिव्ह हेड – साऊथ, आर के स्वामी बीबीडीओ म्हणाल्या, जीवनात होणाऱ्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडू शकतोया अंतर्दृष्टीवर आम्ही ही जाहिरात तयार केली आहे. जर एखादी तरुण मुलगी आरामात आणि स्वच्छतापूर्वक आपल्या मासिक पाळीचे व्यवस्थापन करू शकेलतर ती महाविद्यालयात आत्मविश्वासाने जाऊ शकते आणि तिला उत्तम शिक्षणचांगल्या संधी मिळून दीर्घकाळात ती स्वत:साठी चांगले जीवन जगू शकते. सामान्यत: प्रत्येक मुलीसाठीमहाविद्यालयीन जीवन हा एक महत्त्वपूर्ण बिंदू असतो आणि जर या काळात मासिक पाळीशी संबंधित काही चुकीच्या गोष्टी झाल्यातर बर्‍याच मुलींना महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते किंवा लज्जास्पद अवस्थेत घरातच राहावे लागते. म्हणूनचमुलींच्या जीवनातील या गंभीर टप्प्यावरया टीव्हीसीच्या माध्यमातूनकॉम्फी तिचा हात धरुन या उंबरठ्यावरुन एका चांगल्या भविष्यात जाण्यास उद्द्युक्त करतेतिला आत्मविश्वासाने बाहेर पडायला मदत करते आणि तिला बांधल्यासारखे वाटण्याऐवजी उडण्यास सहाय्य करते. आम्हाला मुक्ती हा संदेश द्यायचा होता आणि या जाहिरातीमधील घोषवाक्य हाच संदेश नमूद करते, मुड के नहीउड के देखो (डाग तपासण्यासाठी मागे वळून पाहू नकाउडत राहा). प्रत्येक तरुण मुलीला स्वत:चे अस्तित्व राखता यावे आणि आपली पूर्ण क्षमता जोखता यावीहेच कॉम्फीचे आश्वासन आहे.

श्रेयनामावली :

     ग्राहक - अमृतांजन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड.
     क्रिएटिव्ह - नवनीत विर्कमीनाक्षी घाटीयोगेश खैरनारवैशाली प्रकाश.
     अकाउंट व्यवस्थापन - दिव्या अजितकुमाररम्या मूर्तीमोनिका मारिया.
     स्टुडिओ - पी. शंकरएस. कामेश.
दिग्दर्शक –विवेक दासचौधरी.
     प्रॉडक्शन हाऊस – स्कल्पचर्स.
     निर्माते - चंद्रशेखरप्रियांका प्रवीण राज.

--

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight