सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच - अन्विता फलटणकर

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे. वजनदारपणा बद्दल आपलं मत व्यक्त करताना स्वीटू म्हणजेच अन्विता म्हणाली, "मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight