भारत साजरा करतोय व्हॅलेंटाइन डेकपल टी- शर्ट्ससॉफ्ट टॉइजकॉफी मग्ज आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या मागणीत वाढ झाल्याचे मीशोचे निरीक्षण

        मोठ्या शहरांच्या तुलनेत विशाखापट्टणगुवाहाटीअगरताळाभुवनेश्वर, विजयवाडारायपूर आणि कोईम्बतूर अशा शहरांतून येणाऱ्या मागणीत २ पटींनी वाढ झाल्याचे मिशोचे निरीक्षण

        व्हॅलेंटाइन डे जवळ येत असताना भेटवस्तू खरेदी करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या दुपटीने जास्त

        व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर असताना लैंगिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या मागणीत ५७ टक्क्यांची वाढ

१० फेब्रुवारी २०२२ – व्हॅलेंटाइन डे जवळ आला असताना मीशो या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या इंटरनेट कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वस्त्रप्रावरणे, वैयक्तिक उत्पादनेदागिनेसॉफ्ट टॉइज आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या उत्पादन श्रेणीतील एकंदरीत ऑर्डर्समध्ये सरासरी ५० टक्के वाढ झाली आहे. प्रेमाच्या या सीझनमध्ये यंदा पुरुषांच्या तुलनेत भेटवस्तू खरेदी करणाऱ्या स्त्रियांची संखया दोन पटींनी जास्त आहे.

मोठ्या शहरांच्या तुलनेत विशाखापट्टणगुवाहाटी, अगरताळाभुवनेश्वरविजयवाडारायपूर आणि कोईम्बतूर अशा शहरांतून येणाऱ्या मागणीत २ पटींनी वाढ झाल्याचे निरीक्षण मीशोने नोंदवले आहे.

 

व्हॅलेंटाइन डे निमित्त तेजीत असलेल्या ट्रेंड्समध्ये पुढील बाबींचा समावेश आहे -

        मीशोवरील सर्वाधिक सर्च केलेल्या कीवर्ड्समध्ये रोझ गिफ्ट बॉक्स’, ‘सॉफ्ट टॉइज’ ‘व्हॅलेंटाइन डेज गिफ्ट्स’ यांचा समावेश आहे.

        प्लॅटफॉर्मवर कपल ची- शर्ट्सच्या मागणीत ८० टक्के वाढ झाली असून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मागणी कपल टी- शर्ट्सघड्याळे आणि स्वेटशर्ट्सना असून ही मागणी भद्रावतीकोटासालूरहॉस्पेटवलसाडपंचकुला अशा चौथ्या श्रेणीतल्या शहरांतून येत आहे.

        दागिने आणि मेकअपफेशियल किट्स आणि मसाजर्ससारख्या वैयक्तिक गरजेच्या उत्पादनांच्या मागणीत ५० टक्के वाढ झाली आहे.

        गिफ्ट हँपर्सना असलेल्या मागणीत पहिल्या श्रेणीतील शहरे व मोठ्या शहरांच्या तुलनेत दुसऱ्या श्रेणीतील शहरांकडून चार पटींनी वाढ झाली आहे.

        लैंगिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या मागणीत ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

 

मीशोच्या व्यवसाय विभागाचे सीएक्सओ उत्क्रिष्ट कुमार म्हणाले, भारतातील ई- कॉमर्स बाजारपेठेच्या मूल्यात जबरदस्त क्षणता आहे. मीशोमध्ये आम्ही देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्धता व किंमतीच्या समस्या सोडवत आहोत. व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन जवळ येत असतानाच ऑर्डर्समध्ये दीडपट वाढ झाल्याचे आमचे निरीक्षण आहे. विशेष म्हणजेयापैकी ८० टक्के मागणी दुसऱ्या श्रेणीतील शहरांकडून आली आहे. आज ग्राहक डिजिटल सॅव्ही झाले आहेत आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात ई- कॉमर्सकडे वळत आहेत.

मीशोद्वारे वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ७७ दशलक्ष अभिनव उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. ग्राहकांना घरबसल्या विविध उत्पादने कमी किंमतीत खरेदी करण्याची सोयही मीशोने उपलब्ध करून दिली आहे. २०२१ मध्ये एकूण ७१ टक्के नवे मीशो युजर्स भारताच्या तिसऱ्या श्रेणीच्या शहरांतील आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight