रॅपीपेचा डिजिटल बँकिंगमध्ये प्रवेश, उभे केले 15 दशलक्ष डॉलर्स

  • भारतातील सर्वांत मोठी डिजिटल बँकिंग आणि वित्तीय परिसंस्था उभी करणार आणि सध्याच्या पेमेंट व्यवसायाची व्याप्ती वाढवणार
  • डिजिटल बँकिंग आणि वित्तीय सेवांसाठी अशा प्रकारचे पहिलेच सुपर अॅप सुरू करणार

नवी दिल्ली/मुंबई, 15 फेब्रुवारी, 2022: फिनटेक क्षेत्रातील आघाडीचे स्थान आणखी भक्कम करत रॅपीपेने, NYE हे नवीन युगातील डिजिटल बँकिंग सुपर अॅप सुरू करण्यासाठी $15 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे. रॅपीपेने ज्या प्रकारे वाढ साध्य केली आहे त्यावर विश्वास ठेवून, वर्तमान निधीउभारणी फेरीचे नेतृत्व वरुण जयपुरीया (RJ कॉर्प), DLF फॅमिली ऑफिस, राहुल गौतम (शीला फोम) आणि रोहन कुमार (DS ग्रुप) हे करत आहेत. गुंतवणूकदारांना NYE मध्ये (डिजिटल बँकिंग सुपर अॅप) समन्वयाची क्षमता दिसत आहे. त्यांचे 6 दशलक्ष व्यापाऱ्यांचे संपूर्ण रिटेल नेटवर्क, आपल्या पगार व चालू खाती, पेमेंट सोल्युशन्स, रिटेल व व्यवसाय कर्जे, बाय नाऊ पे लेटर, गुंतवणुका, विमा आणि अन्य सोयीस्कर सेवा अशा सर्व गरजांसाठी, हे सुपर अॅप वापरू शकतील असे गुंतवणूकदारांना दिसत आहे. 

 

रॅपीपे ही, सुमारे 5 लाख हायब्रिड डायरेक्ट बिझनेस आउटलेट्सची (DBO) तयार फिजिटल संरचना असलेली, देशातील एकमेवर डिजिटल बँकिंग कंपनी आहे. कंपनी दररोज 1 दशलक्ष व्यवहार करते आणि 100 दशलक्ष ग्राहकांना कंपनीने आत्तापर्यंत सेवा दिली आहे. रोख रक्कम काढणे व जमा करणे, AEPS, मायक्रो ATM, POS, युटिलिटी पेमेंट्स, कर्जे व विमा या सेवांमध्ये कंपनी मासिक तत्त्वावर 25 टक्के एवढी दमदार वाढ साध्य करत आहे.

 

कंपनीपुढे आता 2 दशलक्ष प्राथमिक चालू व वेतन बँकखाती, 1 दशलक्ष POS मशिन्सची स्थापना करणे, 30 अब्ज डॉलर्सचा GTV, 150 दशलक्ष अनन्यसाधारण ग्राहक, 3.5 दशलक्ष दैनंदिन व्यवहार आणि 2025 सालापर्यंत 2 दशलक्ष हायब्रिड DBOची फिटिजल संरचना, ही उद्दिष्टे आहेत. हायब्रिड DBO, देशातील सर्व भौगोलिक प्रदेशांमधील तसेच विभागांमधील ग्राहकांना 24/7 बँकिंग सेवा, घरपोच पुरवतील.

 

रॅपीपेचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. योगेंद्र कश्यप, निधीउभारणीच्या आत्ताच पार पडलेल्या फेरीबद्दल, म्हणाले, “B2B विभागातील आमच्या वाढीशी कोणीच बरोबरी करू शकत नाही. आम्ही केवळ 3 वर्षांत असिस्टेड पेमेंट्सच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी झालो. NYEच्या माध्यमातून B2C बाजारपेठेत प्रवेश करणे ही व्यवसायातील नैसर्गिक प्रगती आहे आणि येथेही आम्ही यशाची पुनरावृत्ती करू असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. नवीन भांडवलाचा उपयोग, देशातील ग्राहक व व्यवसाय दोहोंसाठी, दमदार डिजिटल वित्तीय परिसंस्था उभारण्यासाठी केला जाईल. प्रथम संशोधन करणे, गरजा समजून घेणे आणि मग त्यानुसार व्यवहार्य व्यवसाय प्रारूप विकसित करणे हे रॅपीपेमध्ये आमचे तत्त्व आहे. ग्राहक मिळवण्यासाठी उगाच भांडवल खर्च करण्यावर आमचा विश्वास नाही.”

 

रॅपीपेचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्री. निपुन जैन म्हणाले, “कोविड साथीमुळे ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांमध्ये मोठा बदल झाला आणि देशाच्या अगदी दुर्गम भागातील ग्राहकही फिजिटल बँकिंगला पसंती देऊ लागले. NYEच्या माध्यमातून, आमचे उद्दिष्ट, तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन, अखंडित व सुरक्षित पद्धतीने बँकिंग व वित्तीय सेवा पुरवणारी सोपी, सोयीस्कर व नवोन्मेषकारी सोल्युशन्स निर्माण करणे हे आहे. NYE हे अशा प्रकारचे पहिलेच बँकिंग सुपर अॅप आहे. ते अनेकविध बँकखाती, व्यवहार आणि सर्व प्रकारच्या वित्तीय आवश्यकतांचे व्यवस्थापन एका लॉगइनच्या माध्यमातून करते आणि सर्व व्यवहारांचा सारांश एका दृष्टिक्षेपात दाखवते.”

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable