एम्‍पायर सेंट्रमचा 'महाराष्‍ट्रातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क' असण्‍यासाठी 'प्राइड ऑफ महाराष्‍ट्र अवॉर्ड २०२०-२१' पुरस्‍कारासह सन्‍मान

रिअल इस्‍टेट क्षेत्रामध्‍ये सर्वात प्रतिष्ठित नाव असलेली एम्‍पायर सेंट्रम टाऊनशिप रेसिडन्‍सी, कमर्शियल व इंडस्‍ट्रीयल प्रॉपर्टीवर लक्ष केंद्रित करते
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२२: एम्‍पायर सेंट्रमला संपूर्ण महाराष्‍ट्रातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क म्‍हणून प्रतिष्ठित 'प्राइम ऑफ महाराष्‍ट्र अवॉर्ड २०२०-२१' पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्‍ट्र औद्योगिक व आर्थिक विकास संघटना आणि एसएमई चेम्‍बर ऑफ इंडिया यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने या पुरस्‍कार समारोहाचे आयोजन करण्‍यात आले.
महाराष्‍ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे अनेक प्रख्‍यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्माननीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'प्राइड ऑफ महाराष्‍ट्र अवॉर्ड' उद्योग, संस्‍था, उद्योजक व व्‍यक्‍तींना आर्थिक, औद्योगिक व एसएमई विकास व पायाभूत सुविधा विकासाप्रती त्‍यांची अद्वितीय कामगिरी व योगदानाकरिता सन्‍मानित व प्रशंसित करतो. दरवर्षी सर्वोत्तम व प्रतिभावान व्‍यक्‍तींना प्रशंसित केले जाते.
यंदा विजेत्‍यांची निवड केलेल्‍या ज्‍युरीमध्‍ये प्रतिष्ठित रिअल इस्‍टेट तज्ञ व उद्योजकांचा समावेश होता. निवड संदर्भातील निकष विविध घटकांवर आधारित होते आणि निवड समितीमध्‍ये विविध क्षेत्रांमधील तज्ञांचा समावेश होता. पुनरावलोकन सत्र व विश्‍लेषणानंतर शिफारस करण्‍यात आलेल्‍या नामांकनांना व्‍यवस्‍थापन समितीकडे सादर करण्‍यात आले.
हा पुरस्‍कार मिळाल्‍याबाबत आनंद व्‍यक्‍त करत एम्‍पायर सेंट्रमचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संचालक श्री. अनूप कुमार भार्गव म्‍हणाले, ''आम्‍हाला हा प्रतिष्ठित पुरस्‍कार मिळाल्‍याचा आनंद होण्‍यासोबत सन्‍माननीय वाटत आहे. मुंबईतील आघाडीचे विकासक म्‍हणून आम्‍ही प्रिमिअम निवासी ब्रॅण्‍ड्स निर्माण करण्‍यासोबत जागतिक दर्जाचे निवासी व औद्योगिक प्रकल्‍प निर्माण करतो. या सन्‍मानाने आमच्‍यामध्‍ये परिपूर्णतेची भावना जागृत केली आणि आम्‍हाला अधिक उत्तम कामगिरी करण्‍यास प्रोत्‍साहित केले. 'प्राइड ऑफ महाराष्‍ट्र' पुरस्‍कार निश्चितच कोणत्‍याही व्‍यक्‍तीसाठी किंवा कंपनीसाठी अद्वितीय कामगिरी आहे.''

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight