अदितीचा हा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि सिडचे अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते हे सत्य अदिती मोठ्या बाईंना सांगते आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो व त्या चक्कर येऊन पडतात. मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपूर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. अदिती सिडसमोर तिने मोठ्याबाईंना तुला अमेरिकेला जायचंय असं खरं सांगितल्याचं सांगते त्यामुळे आता मालिकेत एक विलक्षण वळण येणार आहे. सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं मोठ्या बाईंना सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते. त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. देवळात जायला बायका निघतात तर अदिती वन पिस ड्रेस घालून येते आणि मुद्दाम अशा काही गोष्टी करते जेणेकरून कुटुंबियांना तिचा राग येईल. अदितीच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतील का? सिड सगळ्यांना खरं सांगेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight