साह पॉलिमर्स लिमिटेड...

साह पॉलिमर्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर, प्रति इक्विटी शेअर Rs. 61 ते Rs. 65च्या किंमतीचा बँड निश्चित करून, शुक्रवार, 30 डिसेंबर, 2022 रोजी खुली होणार

·         प्रत्येकी रु. 10चे दर्शनी मूल्य असलेला, प्रति इक्विटी शेअर रु. 61 - रु. 65च्या किंमतीचा बँड ("इक्विटी शेअर्स")

·         अँकर गुंतवणूकदाराद्वारे बोली लावण्याची तारीख- गुरुवार 29 डिसेंबर, 2022*

·         बोली/ऑफर खुली होण्याची तारीख - शुक्रवार, 30 डिसेंबर, 2022 आणि बोली/ऑफर बंद होण्याची तारीख - बुधवार, 4 जानेवारी, 2023.

·         बोलीचा कमीत कमी लॉट, 230 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 230 इक्विटी शेअर्सच्या पटीत आहे.

·         फ्लोअर प्राइस ही, इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 6.1 पट आणि कॅप प्राइस ही, इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 6.5 पट आहे.

*Company in consultation with the BRLM may consider participation by Anchor Investors in accordance with the SEBI ICDR Regulations. The Anchor Investor Bidding Date shall be one Working Day prior to the Bid/Issuer Opening Date.

Risks to Investors

The BRLM associated with the Offer have handled 08 public issues in the past three years, out of which 01 issue was closed below the offer price on the listing date respectively.

Name of BRLM

Total Issues

Issues closed below IPO Price on listing date

Pantomath Capital Advisors Private Limited

8

1

मुंबई, 26 डिसेंबर, 2022: साह पॉलिमर्स लिमिटेडचा, प्रामुख्याने पॉलीप्रॉपिलीन (PP)/हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE) फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBC) पिशव्या, विणलेली पोते (सॅक), पॉलीप्रॉपिलीन (PP)/ हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE) विणलेले कापड, पॉलिमरवर आधारित विणलेली उत्पादने तयार करण्याचा आणि विक्री करण्याचा व्यवसाय आहे आणि तिने, तिच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी, प्रति इक्विटी शेअर रु. 61 ते रु. 65 अशा किंमतीचा बँड निश्चित केला आहे. कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (“IPO” किंवा “ऑफर”), शुक्रवार, 30 डिसेंबर, 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि बुधवार, 4 जानेवारी, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार, किमान 230 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 230 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.


रु. 10 प्रति इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य असलेल्या या सार्वजनिक इश्यूमध्ये 102,00,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ताज्या इश्यूचा समावेश आहे, ज्यामध्ये विक्री घटका (सेल कंपोनेंट)साठी कोणतीही ऑफर नाही.

 

साह पॉलिमर्सचे नेतृत्व असद दाऊद करत आहेत आणि हकीम सादिक अली टिडीवाला आणि मुर्तझा अली मोती यांचे, फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBC) पॅकेजिंग क्षेत्रात सुमारे 20 वर्षांचे एकत्रित कौशल्य असलेले व्यावसायिक सहाय्य आहे. कंपनीद्वारे, कृषी कीटकनाशके, मूलभूत औषधे, सिमेंट, रसायने, खते , खाद्य उत्पादने, कापड, सिरॅमिक्स आणि स्टील यासह विविध उद्योगांमध्ये बिझिनेस-टू-बिझिनेस ("B2B") उत्पादकांना अनुरूप बल्क पॅकेजिंग सोल्युशन्स  प्रदान केली जातात.

कंपनीद्वारे, तिची उत्पादने, यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, यूएई, आफ्रिका, फ्रान्स आणि पोलंडसह 14 देशांमध्ये निर्यात केली जातात. कंपनीची बहुतांश विक्री निर्यातीतून होते. 30 जून, 2022 रोजी संपलेल्या 3 महिन्यांसाठी आणि आर्थिक वर्ष 2022 साठी, ऑपरेशन्सपासूनच्या एकूण महसुलात, कंपनीच्या निर्यातीतील महसुलाचा वाटा, अनुक्रमे 57.61% आणि 55.14% आहे. 

नेट-वर्थवर परतावा 16.42% आहे आणि वर्ष 2022ला संपलेल्या वर्षासाठी, करानंतरच्या नफ्या (PAT)चे मार्जिन 5.39% आहे. कंपनीची विक्री, आर्थिक वर्ष 2020मधील रु. 49.90 कोटी वरून, आर्थिक वर्ष 22मध्ये रु. 81.23 कोटी वाढली आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत, विक्री रु. 27.59 कोटी होती. अशा प्रकारे, मागील तीन पूर्ण वर्षांसाठी विक्रीचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) 27.6% आहे. त्याचप्रमाणे, करोत्तर नफा, म्हणजे, कंपनीचा करानंतरचा नफा (PAT), गेल्या तीन वर्षांत, 284%च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दरा (CAGR)ने वाढला आहे.

कंपनी, स्थापित क्षमतेच्या 85% ते 92%पर्यंत कार्य करते आणि त्यामुळे पुढील भांडवली खर्चा (कॅपिटल एक्पेंडीचर -कॅपेक्स)साठी प्रयत्न करणार आहे. एकूण भांडवली खर्च (कॅपिटल एक्पेंडीचर -कॅपेक्स) रु. 33.81 कोटी, त्यापैकी कंपनीने होल्डिंग कंपनीकडून रु.15.71 कोटीचे ब्रिज लोन घेतले आहे. नवीन प्रकल्प, 2022-23 या वर्षातच व्यावसायिक कामकाज सुरू करेल असा अंदाज आहे. सध्याच्या उत्पादन सुविधे (मेवाड औद्योगिक क्षेत्र, माद्री, उदयपूर, राजस्थान येथे स्थित)पैकी, कंपनीद्वारे, 500 किलोग्रॅम प्रति बॅग/पोतीच्या फिलिंग कॅपॅसिटीसह, हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE)/पॉलीप्रॉपिलीन (PP) विणलेली पोती (सॅक्स) आणि फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBC) उत्पादनांच्या विविध श्रेणीचे उत्पादन केले जाते. नवीन युनिटमधून 2,500 किलोग्रॅमपर्यंत फिलिंग कॅपॅसिटीसह फ्लेक्सिबल इंटरमीडिएट बल्क कंटेनर्स (FIBC) उत्पादनांचे नवीन प्रकार तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. नवीन युनिटची स्थापित क्षमता 3,960 मेट्रिक टन प्रतिवर्ष आहे, जी सध्याच्या क्षमतेच्या समतुल्य आहे, त्यामुळे नवीन प्लांट सुरू झाल्यावर कंपनीची क्षमता दुप्पट होईल.

कानपूर प्लास्टीपॅक लि., ऋषी टेकटेक्स लि., गोपाला पॉलीप्लास्ट लि., जंबो बॅग लि., एसएमव्हीडी (SMVD) पॉलीपॅक लि., ईएमएमबीआय (EMMBI) इंडस्ट्रीज लि., आणि कमर्शियल सिं. बॅग्स लि. स्पर्धक आहेत; तथापि, कंपनीचा प्रकार, उत्पादने/सेवांची श्रेणी, उलाढाल आणि आकार यामुळे, समकक्षां (पिअर्स)ची थेट तुलना करता येत नाही. ऑफरमध्ये उघड केल्याप्रमाणे तपशील खाली दिला आहे:

(Rs.in lakhs) (As on March 31, 2022)

 

Key Performance Indicators

Sah Polymers Limited#

Peer-Group

 

Rishi Techtex Limited

Jumbo Bag Limited

SMVD Poly Pack Limited

EMMBI Industries Limited

Commercial Synbag Limited

Revenue from Operations

8,051.14

10,085.75

13,056.50

8,624.13

43,562.20

32,158.0

EBITDA(3)

773.40

634.89

983.92

306.55

4920.8

3487.65

EBITDA Margin(4)

9.61%

6.29

7.50

8.11

11.29

10.85%

Profit After Tax for the Year / Period

437.54

131.85

106.09

104.63

1,903.30

1,818.28

PAT Margin(5)

5.43%

1.30%

0.81%

1.21

4.37

5.65

ROE(6)

16.42%

17.83%

3.35%

4.65

12.41

0.20%

ROCE(7)

0.14

10.55

14

9.07

8.19

0.15

Debt / Equity(8)

1.15

0.98

2.61

1.40

0.94

0.69

Market capitalisation rs. In lakhs.

-

2066

1851

1520

16372

43701

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight