डिजिटल लॉक्सच्या मदतीने घराची सुरक्षा आता होणार सोपी

डिजिटल लॉक्सच्या मदतीने घराची सुरक्षा आता होणार सोपी

आजच्या वेगवान, आधुनिक आणि डिजिटल पातळीवर आमूलाग्र बदललेल्या समाजात सुरक्षा आणि खासगीपणा खूप महत्त्वाचा झाला आहे. ब्रँडद्वारे घरमालकांना डिजिटल लॉकिंग सुविधांची श्रेणी उपलब्ध करून दिली जात असून त्यामुळे त्यांना आपले घर सुरक्षित ठेवता येतेचशिवाय त्याची कोणत्याही घराच्या सजावटीला शोभेल अशी आकर्षक स्टाइल घराचे रूप आणखी उठावदार करते. कुलुपं घराच्या सुरक्षेची पहिली पायरी असतात. म्हणूनच गोदरेज लॉक्स ग्राहकांना उच्च दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या आधुनिक लॉक्सविषयी शिक्षित करत त्यांना विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी मदत करत आहे.

गोदरेज लॉक्सचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांनी डिजिटल लॉक्स कशाप्रकारे जास्त सोयीस्कर आणि सुरक्षित आहेत याविषयी माहिती देताना पुढील मुद्द्यांवर भर दिला.

स्मार्ट कीलेस सुविधा

डिजिटल लॉक्स अतिशय सोप्या पद्धतीने घर मालकांना त्यांच्या चीजवस्तू सुरक्षित ठेवण्यात मदत करतात असे म्हणायला हरकत नाहीकारण या लॉक्ससाठी किल्लीची गरज नसते. ही अत्याधुनिक डिजिटल लॉक्स मोबाइल अपच्या मदतीने दुरूनही वापरता येऊ शकतात. त्याशिवाय इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने कोणत्याही ठिकाणावरून लॉकची स्थिती जाणून घेता येते. महत्त्वाचे म्हणजेया लॉक्ससाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे पासकोड्स आणि फिंगरप्रिंट्स ठेवण्याची सोय असल्यामुळे त्यांचा वापर करणे सर्वांसाठी सोपे होते.

हॅक करण्यासाठी अवघड

डिजिटल लॉक्सद्वारे पिनस्मार्टकार्डमॅन्युअल की आणि बायोमेट्रिक अक्सेसिबिलिटी असे अधिकृतता तपासण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. हे एक अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य आहेज्यामध्ये दोन स्तरीय पडताळणी समाविष्ट करून स्मार्ट लॉकचा अनाधिकृत वापर होण्यापासून संरक्षण करता येते. ब्रँडेड लॉक्स फर्मवेयर आणि सुरक्षा अपडेट्सचा वापर करत असल्यामुळे लॉक्स अद्ययावत राहातात आणि सुरक्षा मजबूत राखण्यास मदत होते.

इन्स्टॉल करण्यास आणि वापरण्यास सोपे

डिजिटल लॉक्सचे इन्स्टॉलेशन आणि हाताळणी ग्राहकांसाठी सोपी व सोयीस्कर करण्यात आली आहे. लॉक वापरताना त्यांना व्हिडिओ ट्युटोरियल्सचीही मदत घेता येऊ शकते. गोदरेज डिजिटल लॉक्समध्ये दोनपेक्षा जास्त बोल्ट्स असतात, ज्यामुळे त्याची चोरी प्रतिबंधकता उच्च दर्जाची आहेतर काही डिजिटल लॉक्समध्ये असलेल्या मेकॅनिकल ओव्हरराइडमुळे ते आणखी विश्वासार्ह झाले आहेत.

अधिक जास्त सुरक्षितता                       

बहुतेक डिजिटल लॉक्स बॅटरीवर चालणारी असल्यामुळे वीज नसतानाही त्यांचे काम सुरूच राहाते. विशेश म्हणजेत्यात बसवण्यात आलेली पॉवर सेन्सर्स बॅटरी संपण्यापूर्वी एक आठवडा घरमालकाला तशी सूचना देतात व बॅटरी बदलण्यासाठी बराच वेळ मिळतो.

या आधुनिक लॉक्समध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण सेन्सरमुळे आगीची त्वरित सूचना मिळते व घर लगेच अनलॉक करता येते. या लक्षणीय सुविधेमुळे आग व तत्सम प्रकारच्या घटनांमध्ये मोठा फायदा होतो.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight