‘सुर्या’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण...

   ‘सुर्या’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण

ॲक्शनपॅक्ड ट्रेलर प्रदर्शित

ॲक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज ॲक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला सुर्या हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित सुर्या’  या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. असत्याविरुद्ध सत्याचा लढात्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी ‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या सुर्या या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेशरुचिता जाधवदेवशी खंडुरी हे युवा चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.

सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार.. 'सुर्या'… अशा जबरदस्त टॅग लाईनसह प्रसाद मंगेश हा नवोदित अभिनेता या चित्रपटात नायकाच्या रूपात आपला धमाका दाखविण्यास सज्ज झाला आहे. अॅक्शनने ठासून भरलेला' ‘सुर्या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

 

स्वतःच्या अस्तित्वावरकुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग सुर्या आलेल्या संकटावर कशी मात करतो याची रंजक कथा दाखवतानाच मैत्रीचं अबोल नातं जपणारी रिया आणि सुर्याच्या प्रत्येक लढ्यात त्याची ढाल बनून राहणारी काजल या दोघींच्या प्रेमाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. या तिघांसोबत हेमंत बिर्जेउदय टिकेकरअखिलेंद्र मिश्रागणेश यादवसंदेश जाधवपंकज विष्णूहॅरी जोशअरुण नलावडेसंजीवनी जाधवराघवेंद्र कडकोळदीपज्योती नाईकप्रताप बोऱ्हाडेप्रदीप पटवर्धनदिलीप साडविलकरजसबीर थंडी आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

 

सुर्या चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदममंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदममंगेश केदारहेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्यउमेश जाधवराहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाणसंतोष दरेकरसंजय मिश्रादेव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ॲक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेशचेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight