वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०२४..

मुंबईत होणार वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०२४ चे आयोजन

•      महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये

•      जगभरातून येतील १००० प्रतिनिधी

•      तीन दिवसांचा हा कार्यक्रम असेल : १३ ते १५ डिसेंबर, २०० हून अधिक सत्रे

•      NSE, SEBI, L&T, LIC, SEBI, भारत सरकारच्या प्रमुख संस्थांसह, नवभारत आणि नवउद्योगांच्या प्रगतीसाठी भारत स्तरावरचा उपक्रम

मुंबई, 9 दिसंबर, 2024: वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरमची (डब्ल्यूएचईएफ) वार्षिक परिषद मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. 'थिंक इन द फ्युचर, फॉर द फ्युचर' (भविष्यात, भविष्यासाठी विचार करा) ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून विविध उद्योगक्षेत्रांमध्ये सहयोग, इनोव्हेशन आणि प्रगतीला प्रेरणा देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, एनएसईचे सीईओ आशिषकुमार चौहान, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अध्यक्ष के. व्ही. कामत आणि हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी तीन दिवसीय फोरममध्ये प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

डब्ल्यूएचईएफ ही संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूरचे माजी विद्यार्थी श्री स्वामी विज्ञानानंद यांनी स्थापन केली. शाश्वत आर्थिक प्रारुपांचा प्रसार करून जागतिक पातळीवर सहयोगाला चालना देऊन समाज समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाने ही संस्था स्थापन करण्यात आली. या वर्षीच्या फोरममध्ये 24 सत्रे आणि 100 हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रभावी नेतृत्व, उद्योजक, व्यवसायक्षेत्रांमधील द्रष्टे असे जागतिक पातळीवरील 1000+ अभ्यागत उपस्थित असतील.

"या फोरममध्ये ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी अतुलनीय संधी मिळणार आहे. फायनान्स, तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग ही आघाडीची क्षेत्रे आणि सरकारमधील प्रतिष्ठित वक्त्यांकडून महत्त्वाची माहिती प्राप्त होईल. हे एक रोमांचक व्यासपीठ असून नैतिकता आणि समुदायकेंद्री मूल्यांच्या आधारे समृद्धी वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी सहयोग साधण्यासाठी सक्षम करते. सर्वांना लाभदायक ठरणाऱ्या शाश्वत आर्थिक वाढीचे भविष्य कशा प्रकारे घडविता येईल, यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांना जोडण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत", असे मुंबईतील आयएमसी येथे आयोजित कर्टन रेझर समारंभात स्वामी विज्ञानानंद म्हणाले.

2012 मध्ये झालेल्या डब्ल्यूएचईएफच्या स्थापनेपासून हाँगकाँग, बँकॉक, नवी दिल्ली, लंडन, लॉसएंजिलिस, शिकागो आणि मुंबई तसेच क्वालालंपूर, ऑकलंड, फिजी, डर्बन आणि फ्रँकफर्ट येथे विभागीय पातळीवर वार्षिक फोरमचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

"डब्ल्यूएचईएफच्या परिषदा जगभरात आयोजित करण्यात येतात आणि कोव्हिडनंतर आम्ही पुन्हा एकदा भारतात परत आलोय, जो जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या आणि या बहुध्रुवीय जगात एक महत्त्वाचा ध्रुव म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे.", असे डब्ल्यूएचईएफच्या आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजेश शर्मा म्हणाले.

"मुंबई हे भारताच्या प्रगतीचे इंजिन आहे आणि आपले नवे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विकास, भक्कम शासन आणि आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यात आपले कौशल्य प्रभावीपणे सिद्ध केले आहे. आगामी वर्षे या अस्थिर जगात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि डब्ल्यूएचईएफ 2024 आपल्याला भविष्यातील व्यावसायिक परिस्थितीचा अंदाज बांधण्यास मदत करेल."

"आमच्या टीमने पारंपरिक व उदयोन्मुख क्षेत्रांमधील प्रतिष्ठित वक्त्यांची निवड केली आहे. एलअँडटी सेमीकंडक्टर टेक्नोलॉजीजचे प्रमुख एस. एम. सुदर्शन, एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, भारत फोर्जचे उपाध्यक्ष अमित कल्याणी आणि उद्योग व वित्त जगतातील तज्ज्ञ त्यांचे विचार मांडतील.", असे डब्ल्यूएचईएफ 2024च्या आयोजन समितीचे सचिव श्री. रविकांत मिश्रा म्हणाले.

"डब्ल्यूएचईएफ 2024 मध्ये डब्ल्यूएचईएफ लाँचपॅड सादर करण्यात येईल. स्टार्टअप्ससाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना जगासमोर सादर करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांसमोर मांडण्यासाठी हे एक रोमांचक नवीन व्यासपीठ आहे. हा उपक्रम उद्योजकता आणि आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या मंचाच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकतो", असे डब्ल्यूएचईएफ 2024च्या आयोजन समितीचे सहसचिव श्री. शैलेश त्रिवेदी म्हणाले.

रोमांचक चर्चा, नेटवर्किंगच्या संधी आणि धोरणात्मक सहयोग यामुळे डब्ल्यूएचईएफ 2024 विविध उद्योगांच्या भविष्याला प्रेरणा देण्यास आणि धोरणात्मक परिवर्तन घडविण्यास मदत करेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight