‘सालबर्डी’चा थरार कायम

 दुसऱ्या आठवड्यातही सालबर्डीचा थरार कायम

गूढथरार आणि सत्याच्या शोधाचा प्रभावी संगम साधणाऱ्या सालबर्डी या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता दुसऱ्या आठवड्यातही त्याच दमदार प्रतिसादासह सालबर्डीची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पहायला मिळते आहे. रहस्यमय कथानकअनपेक्षित वळणं आणि उत्कंठावर्धक सादरीकरण ही सालबर्डीची प्रमुख वैशिष्ट्यं ठरत आहेत. प्रत्येक प्रसंगात दडलेलं गूढ आणि त्याचा उलगडा करण्याची सततची धडपड प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यामुळेच राज्यभरात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

दुसऱ्या आठवड्यात अनेक चित्रपटगृहांत हाऊसफुल्लचे फलक झळकत असूनसोशल मीडियावरही सालबर्डी बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पदार्पणाबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं, ‘प्रेक्षकांनी सालबर्डीला दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही मिळत असलेलं प्रेम आम्हाला उत्तम काम करण्याची प्रेरणा देत आहे.

नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या सालबर्डी चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटीलडॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत सोबत शशांक शेंडेओंकार भोजनेभारत गणेशपुरेअंशुमन विचारेरोहित कोकाटेकमलाकर सातपुतेचित्तरंजन गिरीअनिल नगरकरमाधव अभ्यंकरप्रवीण डाळिंबकरअभय गितेराजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांचा दमदार अभिनय पहायला मिळतो आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO