मास्टरकार्डच्या कॉन्सर्ट सिरीज..
वीर दास, झाकीर खान आणि पापोन या पुढच्या पर्वाचे प्रमुख आकर्षण, वंचित समुदायातील तरुणांसाठी प्राईसलेस अनुभव देण्याची मास्टरकार्डची परंपरा कायम
नवी दिल्ली, भारत, २१ एप्रिल २०२६: मास्टरकार्डने भारतात आपल्या बहु-शहरी कॉन्सर्ट सिरीजच्या पुढच्या पर्वाची घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत एका नव्या आणि दमदार स्वरूपात स्टँड-अप कॉमेडी आणि लाईव्ह म्युझिकला एकत्र आणले जात आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जवळ नेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या टप्प्यात भारतातील मनोरंजन क्षेत्रातील काही सर्वात प्रसिद्ध नावे, जसे की वीर दास, झाकीर खान आणि पापोन यांचा समावेश आहे.
एनरिक इग्लेसियास, ए.आर. रहमान आणि सुनिधी चौहान यांसारख्या जागतिक आणि भारतीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलेल्या संगीत-प्रधान कार्यक्रमांच्या यशानंतर, ही कॉन्सर्ट सिरीज आता अधिक व्यापक होत आहे, जी भारतीयांच्या मनोरंजनाच्या बदलत्या आवडीनिवडी दर्शवते. संगीतासोबतच स्टँड-अप कॉमेडीचा समावेश हा एक नैसर्गिक बदल असून, यातून लाईव्ह अनुभवांमध्ये विनोद, कथाकथन आणि समकालीन अभिव्यक्ती आणली जात आहे.
ट्राईब व्हाईब आणि इव्हा लाईव्ह यांच्या सहकार्याने आयोजित या कॉन्सर्ट सिरीजमध्ये आता जगातील सर्वात लोकप्रिय भारतीय विनोदवीरांपैकी एक असलेले वीर दास नवी दिल्लीतील यशोभूमी येथे सादरीकरण करतील. ९ आणि १० मे रोजी दोन दिवसांत त्यांचे चार शो आयोजित करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे, आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि मनाला भिडणाऱ्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले झाकीर खान मुंबईत सादरीकरण करणार आहेत. डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे त्यांचे नऊ शो नियोजित आहेत. सध्या निश्चित झालेल्या तारखांमध्ये १२, १३ आणि १४ जून, तसेच १९ आणि २० जून यांचा समावेश असून, आणखी काही शोजची घोषणा लवकरच केली जाईल.
या सिरीजला एक भक्कम सांगीतिक जोड देत, पापोन देशभरातील सहा शहरांमध्ये लोकसंगीत, शास्त्रीय आणि समकालीन संगीताचा सुरेख मेळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात १६ मे रोजी चंदिगडमधून होईल, त्यानंतर २९ मे रोजी अहमदाबाद आणि ३० मे रोजी लखनौ येथे कार्यक्रम होतील. पुढे ६ जूनला बंगळुरू, ७ जूनला हैदराबाद येथे आणि १४ जून रोजी इंदूरमध्ये या दौऱ्याचा समारोप होईल.
ही संपूर्ण मांडणी विविध शैली, प्रदेश आणि वयोगटातील प्रेक्षकांना आवडणारे प्रीमियम आणि मागणी असलेले लाईव्ह मनोरंजनाचे अनुभव देण्याच्या मास्टरकार्डच्या दृष्टिकोनाला अधोरेखित करते. नेहमीप्रमाणे, मास्टरकार्ड कार्डधारकांना विशेष सुविधा मिळतील, ज्यामध्ये तिकिटांची प्राधान्याने पूर्व-विक्री आणि इव्हेंटच्या ठिकाणी लाउंजचा अॅक्सेस समाविष्ट आहे - ज्यामुळे त्यांचा कॉन्सर्टचा अनुभव अधिक आरामदायी आणि खास बनेल.
मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन, ही कॉन्सर्ट सिरीज संधी आणि प्रवेश उपलब्ध करून देण्याच्या एका व्यापक उद्देशासाठी काम करत आहे. 'लर्निंग लिंक्स फाउंडेशन'सोबत सुरू असलेल्या भागीदारीतून, मास्टरकार्ड वंचित आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या समुदायातील तरुणांना या भव्य लाईव्ह इव्हेंट्सचा अनुभव घेण्याची संधी देत आहे.
दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि चंदिगड यांसारख्या अनेक शहरांमधील सुमारे ९० विद्यार्थ्यांना लाईव्ह मनोरंजनाची भव्यता, ऊर्जा आणि त्यातील रचनात्मक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे - ज्यापैकी अनेकांसाठी हा पहिलाच अनुभव असेल. हे अनुभव केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, तरुणांच्या आकांक्षा पल्लवित करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि 'एक्स्पिरियन्स इकॉनॉमी' मधील करिअरच्या संभाव्य संधींची ओळख करून देण्यासाठी तयार केले आहेत, जे मास्टरकार्डच्या सर्वसमावेशक वाढीच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.
“लाईव्ह मनोरंजन हे संस्कृती आणि लोकांशी जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत असताना, प्रेक्षकांसाठी केवळ अविस्मरणीय अनुभवच नव्हे, तर आपण ज्या समुदायांसाठी काम करतो त्यांच्यासाठीही ते अर्थपूर्ण ठरावेत, यावर आमचा भर आहे. व्यवसाय वाढवण्यासोबतच समाजासाठी चांगले काम करणे आणि संधींची दारे खुली करत सहभाग वाढवणे, हा आमचा विचार आहे,” असे गौतम अग्रवाल, प्रेसिडेंट, भारत आणि दक्षिण आशिया, मास्टरकार्ड यांनी सांगितले.
जाहीर झालेल्या शोजची तिकिटे www.priceless.com/music वर उपलब्ध आहेत.

Comments
Post a Comment