कॅप्री ग्लोबल कॅपिटल...

कँप्री ग्लोबल कँपिटलकडून रु.५०० कोटींची सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबध्द आणि परतफेडयोग्य रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीचा 'पहिला टप्पा' घोषित 

वार्षिक ९.५०% पर्यंत व्याजदर

• पतमानांकन: इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगकडून ‘IVR AA/Positive’ आणि अँक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्चकडून ‘ACUITE AA | Stable’ मानांकन

• रोखे विक्री बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी खुली होईल आणि मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी बंद होईल

• रोख्यांची खरेदी-विक्री व्यवहार 'डीमटेरियलाईज्ड' (कागदविरहित) स्वरूपात केली जाईल

• वाटप 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केले जाईल; रोखेविक्रीला अतिरिक्त मागणी असल्यास वाटप प्रमाणशीर पद्धतीने होईल.

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने ("कंपनी") सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि परतफेड योग्य 'अपरिवर्तनीय रोखे - नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी)'च्या सार्वजनिक विक्रीचा 'पहिला टप्पा' गुरुवारी जाहीर केला. या रोखेविक्रीतून एकूण ₹५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारला जाणार असून, यामध्ये ₹१,०० कोटींचा मूळ आकार (बेस इश्यू साइझ) निश्चित करण्यात आला असून, अधिक प्रतिसाद मिळाल्यास जास्तीचे ४०० कोटी रुपये स्वीकारण्याचा 'ग्रीन शू' पर्याय कंपनीने खुला ठेवला आहे."

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा म्हणाले, "सुरक्षित, मानांकन प्राप्त, सूचीबद्ध आणि परतफेडयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या पहिल्या टप्प्यातील विक्रीचा शुभारंभ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. कॅप्री ग्लोबल कॅपिटलमध्ये, आम्ही आमच्या चार कर्ज विभागांद्वारे - म्हणजेच एमएसएमई कर्जे, गृह कर्जे, सोने तारण कर्जे आणि बांधकाम वित्तपुरवठा - विविध प्रकारची सुरक्षित आणि तारण-आधारित कर्जे उपलब्ध करून देतो. भक्कम अंमलबजावणी क्षमता, जोखीम व्यवस्थापनातील विवेकपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानावर आधारित ग्राहक-संपर्कावर असलेला आमचा विशेष भर; या सामर्थ्यांच्या जोरावर, संपूर्ण भारतभर आर्थिक सेवांपासून वंचित असलेल्या ग्राहकांना आधार देण्याच्या आमच्या उद्देशाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत."

अपरिवर्तनीय रोख्यांच्या या सार्वजनिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असे गुंतवणुकीचे विविध कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, गुंतवणूकदार मासिक किंवा वार्षिक स्वरूपात व्याजाची रक्कम स्वीकारण्याचा पर्याय निवडू शकतात आणि त्यांना वार्षिक ९.५० टक्क्यांपर्यंतचा व्याजदराचा लाभ (कूपन रेट्स) मिळविता येईल. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये अपरिवर्तनी रोख्यांच्या प्रत्येक मालिकेसाठीचे व्याजदर आणि कालावधी यांसह सर्व तपशील नमूद केलेला आहे. हे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) 'बीएसई लिमिटेड'वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

या रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५% निधीचा वापर पुढील कर्जवाटप, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जांचे व्याज व मुद्दल परतफेड करण्यासाठी केला जाईल; आणि उर्वरित निधीचा वापर 'सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी' करण्याचे प्रस्तावित आहे. हा वापर 'पहिला टप्पा' रोखे विक्रीतून उभारलेल्या आणि वाटप केलेल्या रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसावा, अशी अट यास लागू आहे; तसेच हे वापर 'भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (परिवर्तनीय नसलेल्या प्रतिभूतिंचे निर्गमन आणि सूचीकरण) विनियम, २०२१' (SEBI NCS Regulations, 2021) च्या अनुषंगाने केले जातील.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO