मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार

 मराठी कलाकारांची रंगकर्मी क्रिकेट लीग रंगणार

ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार समारंभात अनावरण

रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या बहुचर्चित रंगकर्मी क्रिकेट लीग च्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्ट लॉन्चिंग सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अनेक मान्यवर, कलाकार आणि क्रिकेटप्रेमी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत रंगकर्मी क्रिकेट लीगचे सामने १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर रंगणार आहेत. रंगकर्मी क्रिकेट लीगमध्ये ६ संघ असून त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले आहे. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा रायझिंग’, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली वीर मराठा संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच नुपूर दुधवडकर मर्द मराठा संघाची धुरा सांभाळणार आहेत. हरीश दुधाडे स्टार मराठा संघाचे नेतृत्व करणार असून कांचन पगारे मराठा शिलेदार आणि सागर कारंडे मराठा वॉरियर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

राजकीय नेते श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. ‘कलाकारांमध्ये मैत्री आणि क्रीडाभावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी कलाकारांचा हा अनोखा क्रिकेट महोत्सव अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.   

१४ आणि १५ मे ला रंगणाऱ्या  रंगकर्मी क्रिकेट लीगच्या आयोजनामध्ये संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाची आकर्षक मांडणी करण्यात आली. यावेळी अधिकृत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले तसेच विशेष डिझाइन केलेल्या आकर्षक टी-शर्टचे सादरीकरणही करण्यात आले. लीगसाठी पंडित राठोड, सचिन खंडागळे, संदीप राठोड, ओमकार सर आणि अखिलेश चौबे, भरत नाना पाटील यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले आहे.  

मनोरंजन क्षेत्रातील मराठी कलाकारांना एकत्र आणून मैत्री आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा या लीगचा मुख्य उद्देश असल्याचे मंगेश सांगळे आणि संचित यादव यांनी सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO