फेविक्रिल प्रमाणित व्यावसायिकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
फेविक्रिल प्रमाणित व्यावसायिकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
मुंबई,- पिडिलाइट इंडस्ट्रीज कंपनीच्या आर्ट अँड क्राफ्ट ब्रँड फेविक्रिलने 'आर्टिस्ट इन दि मी' या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १२० हून अधिक आघाडीच्या फेविक्रिल सर्टिफाईड प्रोफेशनल्ससाठी मुंबईत तीन दिवसांच्या निवासी आणि अनुभव आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फेविक्रिलच्या व्यापक कलाकार नेटवर्कमधील तज्ज्ञ प्रशिक्षक या कार्यक्रमात सामील होणार आहेत.
फेविक्रिलसाठी 'आर्टिस्ट इन मी' हा महत्वाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे फेविक्रिल सर्टिफाईड प्रोफेशनल्सना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे सक्षम केले जाणार असल्याचे पिडिलाइट इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष कश्यप गाला यांनी सांगितले. 'ट्रेन दि ट्रेनर' मोहिमेमुळे हे प्रशिक्षक आगामी काळात शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो कलाकारांपर्यंत प्राप्त केलेले ज्ञान पोहोचवतील. हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून कलेबद्दलचे प्रेम साजरे करणारी, कला शिक्षणाला चालना देणारी, कला-उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी आणि देशभरातील नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला प्रेरणा देणारी चळवळ असल्याचे गाला यांनी नमूद केले.
यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 'जोंग ई नारा' या द. कोरियातील अग्रगण्य शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशन संस्थेतर्फे ज्ञान-विनिमय सत्राचे आयोजन करण्यात आले. ही संस्था ओरिगामी आणि पेपर-फोल्डिंग शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध डिजिटल कंटेंट क्रिएटर श्वेता महाडिक यांचे मार्गदर्शन देखील कलाकारांना लाभणार आहे.
डीआयवाय, अपसायकलिंग आणि क्राफ्ट-आधारित कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता महाडिक कलाकारांना डीआयवाय कंटेंटद्वारे प्रभावी डिजिटल उपस्थिती कशी निर्माण करावी आणि ती कशी विस्तारावी, याचे मार्गदर्शन करणार आहेत. जागतिक क्राफ्ट व ट्रेंड आधारित शिक्षण, आंतरराष्ट्रीय डिझाइन ट्रेंड्स, उदयोन्मुख कलाप्रवाहांची माहिती यावेळी दिली जाईल. शिवाय प्रत्यक्ष कार्यशाळेत फेविक्रिलच्या कला साहित्याचा वापर करून प्रगत तंत्र आणि नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले जाणार आहेत.

Comments
Post a Comment