गोदरेज कॅपिटल..

गोदरेज कॅपिटलतर्फे महाराष्ट्रातील परवडणाऱ्या गृहवित्त क्षेत्रातील स्थान अधिक मजबूत; बदलापूर येथे व्यवसायाचा विस्तार

गोदरेज हाऊसिंग फायनान्सने बदलापूर येथे आपल्या परवडणाऱ्या गृहवित्त व्यवसायाचा विस्तार केला असून छत्रपती संभाजीनगर, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव, पुणे (खराडी), पंढरपूर, नागपूर यांसह अन्य भागांमध्येही आपल्या सेवा विस्तारल्या आहेत. 

हा विस्तार विविधांगी वित्तपुरवठा व्यवसाय उभारण्याच्या गोदरेज कॅपिटलच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब आहे.

ठाणे, महाराष्ट्र | 27th ऑक्टोबर 2026: गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने आपली उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील परवडणाऱ्या गृहवित्त क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. बदलापूर येथे व्यवसायाचा विस्तार करून कंपनीने राज्यातील उच्च विकासक्षमता असलेल्या उपनगरीय भागांवर आणि उदयोन्मुख निवासी सूक्ष्म बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याची आपली भूमिका अधिक बळकट केली आहे. 

सुधारणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा, तुलनेने परवडणाऱ्या घरांच्या किमती आणि विस्तारणाऱ्या सामाजिक पायाभूत सुविधांमुळे बदलापूरमध्ये निवासी क्षेत्राचा सातत्याने विकास होत आहे. मुंबई आणि ठाणे येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी बदलापूर हे घर खरेदीचे एक पसंतीचे ठिकाण बनले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांच्या तुलनेत येथे अधिक परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने प्रथमच घर खरेदी करणारे ग्राहक आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार यांच्याकडून सातत्याने मागणी वाढत आहे.

सुरू असलेले निवासी विकास विकास, भाड्याच्या घरांची स्थिर मागणी तसेच रस्ते आणि रेल्वे दळणवळणात नियोजित सुधारणा यांमुळे ठाणे आणि मुंबईशी संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बदलापूरमधील गृहबाजारपेठेच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यता अधिक बळकट होत आहेत. या सर्व घटकांमुळे महाराष्ट्रातील विस्तारत असलेल्या उपनगरीय गृहविकास क्षेत्रात बदलापूरचे स्थान एक महत्त्वाची विकासक्षम बाजारपेठ म्हणून अधिक मजबूत होत आहे.

या विस्ताराबाबत भाष्य करताना गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेहेरनोश टाटा म्हणाले, “महाराष्ट्रातील शहरी तसेच उदयोन्मुख केंद्रांमध्ये घरांची असलेली मजबूत मागणी लक्षात घेता हे राज्य आमच्यासाठी प्राधान्याची बाजारपेठ आहे. टियर-2 शहरांमध्ये आणि सूक्ष्म बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यामागील आमचा उद्देश प्रथमच घर खरेदी करणाऱ्या आणि स्वयंरोजगार असलेल्या ग्राहकांना घर खरेदी अधिक परवडणारी व्हावी आणि गृहवित्त सहज उपलब्ध व्हावे हा आहे. वितरण-केंद्रित दृष्टिकोन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कर्जजोखीम मूल्यांकन आणि ग्राहककेंद्रित उपाययोजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जबाबदार आणि सर्वसमावेशक गृहवित्त सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या व्यापक संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी गोदरेज कॅपिटल पगारदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या ग्राहकांसह प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी लवचिक परतफेड कालावधीचे परवडणारे गृहकर्ज उपलब्ध करून देते. परिसंस्थेवर आधारित धोरणाचा भाग म्हणून, उदयोन्मुख सूक्ष्म बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी 4,000 हून अधिक स्थानिक संपर्क प्रतिनिधी, विकासक आणि वितरण भागीदारांसोबतचा सहयोग अधिक मजबूत करत आहे. त्याचबरोबर, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) 11,800 कोटी रु. पेक्षा अधिक करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

ऑगस्ट 2026 अखेर गोदरेज कॅपिटलची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (AUM) 30,000 कोटी रु. पेक्षा अधिक होती. यामध्ये गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या पोर्टफोलिओमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास 30% आहे. बदलापूर व्यतिरिक्त, कंपनीने शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव, लातूर, पुणे (खराडी), पंढरपूर, अमळनेर आणि चाळीसगाव यांसारख्या प्रमुख केंद्रांमध्येही आपली उपस्थिती वाढवली आहे. यावरून कंपनीच्या दीर्घकालीन विकास आराखड्यात महाराष्ट्राला असलेले धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable