अभीबस
अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना बस तिकिट बुकिंग्जची सेवा देणार आयआरसीटीसीची वेबसाइट व मोबाइल ॲपवर विनासायास मोफत तिकिटींग सेवा देण्यासाठी आयआरसीटीसीसोबत करारावर स्वाक्षरी अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना त्यांच्या सर्व खाजगी , तसेच एसआरटीसी बस सेवा देणार या सहयोगामुळे भारतभरातील आयआरसीटीसी ग्राहकांना १०० , ००० हून अधिक बस मार्गांची सेवा उपलब्ध होणार २५ फेब्रुवारी २०२१: AbhiBus.com या भारताच्या बस तिकिटींगसाठी झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑनलाइन बाजारस्थळाने भारताचे सर्वात मोठे तिकिट बुकिंग व्यासपीठ इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबत सहयोग करत त्यांच्या यशस्वी कामगिरीमध्ये आणखी एका यशाची भर केली आहे. आयआरसीटीसी दररोज ९ लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची सेवा देते. सोबतच हा सहयोग आयआरसीटीसी ग्राहकांसाठी बस तिकिट बुकिंग सेवा देखील उपलब्ध करून देईल , जेथे अभीबस भारत भरात आयआरसीटीसीच्या व्यासपीठावर बस तिकिटींगची सेवा देईल. अभीबस ही बस तिकिटींगमधील सर्वात जुनी कंपनी आह...