जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवर कार्यक्रम

जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार रोहिताश्‍व गौड व हिमानी शिवपुरी म्‍हणाले – पुस्‍तक जीवनाकडे नवीन दृष्टिकोनासह पाहायला शिकवतात

लोकांच्‍या ड्रॉइंग-रूमचा आवश्‍यक भाग असण्‍यापासून प्रवासातील सर्वोत्तम सोबती असण्‍यापर्यंत पुस्‍तक उत्तम सोबत देतात. खरीखुरी प्रत असो किंवा ई-व्‍हर्जन असो पुस्‍तक वाचण्‍याच्‍या आनंदाला कोणतीच सीमा नाही. पुस्‍तक वाचण्‍याच्‍या महत्त्वाबाबत सांगताना एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार – मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) आणि मालिका 'भाबीजी घर पर है'मधील मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड) यंदाच्‍या जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त पुस्‍तकांप्रती असलेल्‍या त्‍यांच्‍या आवडीबाबत सांगत आहेत. त्‍यांच्‍या मते, पुस्‍तक त्‍यांच्‍या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत आणि ते वास्‍तविकतेमध्‍ये जादूची भर करतात. हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ''पुस्‍तक हे माझ्या जीवनाचे अविभाज्‍य भाग आहेत. मी अगदी लहान वयातच वाचनाला सुरूवात केली आणि त्‍यानंतर मी माझे आवडते लेखक व शैलींची लहान लायब्ररी बनवण्‍यास सुरूवात केली. पुस्‍तक वाचन ही कोणीही अंगिकारू शकणारी सर्वोत्तम आवड आहे. माझ्या बालपणापासूनच मी किताबी किडा होते. मी माझ्या आवडत्‍या लेखकांची पुस्‍तके वाचण्‍यामध्‍ये इतकी गुंतून जायची की माझ्या अभ्‍यासाच्‍या पुस्‍तकांकडे लक्षच द्यायची नाही. अर्थातच, यामुळे मला परीक्षेच्‍या वेळी खूपच मेहनत घ्‍यावी लागायची, पण मला तर वाचनाची आवडच जडली होती.'' त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ''मला सर्वाधिक आवडलेली पुस्‍तके म्‍हणजे 'गॅब्रियल गार्सिया मार्कीझ यांचे वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड', 'पोलो कोएल्‍हो यांचे दि आल्‍केमिस्‍ट', 'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी', 'खालीद हुसैनी यांचे दि काइट रनर', 'अमिष यांचे दि शिवा ट्रायलॉजी' आणि झुम्‍पा लहिरी व अरूंधती रॉय यांची अनेक पुस्‍तके. यंदाच्‍या जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मी आवाहन करते की, तुम्‍ही तुमच्‍या जीवनशैलीमध्‍ये वाचनाचा समावेश करा. वाचनामुळे संवाद कौशल्‍यामध्‍ये सुधारणा होते, तसेच पुस्‍तक जीवनाकडे नवीन दृष्टिकोनासह पाहायला शिकवतात.'' रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ''एकांतामध्‍ये पुस्‍तक सोबती असतात. मला खचून गेल्‍यासारखे वाटते, तेव्‍हा कोणाचा आधार घ्‍यावा हे मला माहित आहे. मी माझ्या घरामध्‍ये माझ्यासाठी एक आनंदी कोपरा बनवला आहे, जेथे मी पुस्‍तके वाचत वेळ व्‍यतित करतो आणि नवीन विश्‍वामध्‍ये रममाण होतो. हातामध्‍ये एक कप चहा व सोबत पुस्‍तक असले की तेथेच सर्व कंटाळा निघून जातो. मला माझ्या आवडीनुसार पुस्‍तकांचा क्रम लावायला देखील आवडते. यामधून मला समाधान मिळते. माझ्या आवडत्‍या पुस्‍तकाची निवड करण्‍यास कोणी विचारले की माझ्यासाठी ते खूपच अवघड ठरते. मला नाटकांची पुस्‍तके आणि व्‍यंग वाचायला खूप आवडते. मला शरद जोशी, प्रेमचंद, हरिचंद्र, विजय तेंडुलकर, मोहन राकेश यांची पुस्‍तके व नाटके वाचायला आवडतात. मी त्‍यांची पुस्‍तके हजारो वेळा वारंवार वाचू शकतो. जागतिक पुस्‍तक दिनानिमित्त मी सर्व वयोगटातील लोकांना किमान १५ मिनिटे एखादे पुस्‍तक वाचण्‍यास सुरूवात करण्‍याचे आणि हळूहळू वाचनाची गती व आवड वाढवत पुस्‍तकांची संख्‍या वाढवण्‍याचे आवाहन करतो. पुस्‍तके वाचणे हा छंद असण्‍यासोबत उत्तम जीवनाचा मार्ग ठरू शकतो.''

पहा 'हप्‍पू की उलटन पलटन' रात्री १० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight