झी टॉकीज 'छू मंतर' म्हणत सादर करणार एका पेक्षा एक सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपट

हॉरर कॉमेडी चित्रपटांची मेजवानी अनुभवा झी टॉकीजच्या 'छू मंतर' फिल्म फेस्टिवलमध्ये

हॉरर कॉमेडी चित्रपट बघताना जितके हसू येते, तेवढेच त्यातील काही सीन घाबरवतात देखील. या चित्रपटांचे भन्नाट कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं आणि हसवत हसवत घाबरवून जातं. त्यात मनोरंजन भरपूर असल्यामुळे प्रेक्षकांची या जॉनरच्या चित्रपटांना विशेष पसंती असते. त्यांची हीच आवड लक्षात घेऊन महाराष्ट्राची लाडकी चित्रपट वाहिनी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'छू मंतर' हा खास हॉरर कॉमेडी फिल्म फेस्टिवल सादर करणार आहे.
हा फिल्म फेस्टिवल पुढील आठवड्यात संध्याकाळी  ७वाजता प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. सोमवार २६ एप्रिल रोजी संध्याकाळी  ७वाजता भाऊ कदम आणि अशोक सराफ या धमाल जोडीचा टॉकीज ओरिजिनल 'आलटून पालटून' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. भरत जाधव यांचा भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट 'पछाडलेला' मंगळवारी २७ एप्रिल रोजी प्रसारित होईल. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या हुकमी एक्क्यांचा अजरामर चित्रपट 'थरथराट' बुधवार २८ एप्रिल रोजी सादर होणार असून गुरुवार २९ एप्रिल रोजी 'धडाकेबाज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या हॉरर कॉमेडी फिल्म फेस्टिवलच्या शेवट अशा चित्रपटाने होणार आहे ज्याला अनेक वर्ष होऊन देखील त्या चित्रपटाची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठलेला आणि प्रेक्षकांच्या आज हि लक्षात असलेला 'तात्या विंचू' याने गाजवलेला चित्रपट 'झपाटलेला' हा या फिल्म फेस्टिव्हलची सांगता करेल.
तेव्हा भरगोस मनोरंजनासाठी पाहायला विसरू नका 'छू मंतर' फिल्म फेस्टिवल २६ ते ३० एप्रिल रोज संध्याकाळी  ७वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार