Image result for nafa netafim

नेटाफिमचे पाठबळ असलेल्या नाफाने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इक्विटी आणि ईसीबी द्वारे उभारले

 

नेटाफिम अॅग्रिकल्चरल फायनान्सिंग एजन्सी प्रालि. (नाफाया कृषीभिमुख असलेल्या एनबीएफसी आणि नेटाफिम सिंगापूरची उपकंपनी असलेल्या कंपनीने फिनिक्स ग्रुप आणि कॉगिटो कॅपिटल या दोन इस्राईल स्थित गुंतवणूकदारांकडून एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स च्या (ईसीबीमाध्यमातून ४० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आणली आहेव्यवसाय वृद्धीसुधारीत ऑफरिंग्ज आणि कृषी-ग्रामीण क्षेत्रात व्यवसाय विस्तारण्यास या निधीचा उपयोग करण्यात येणार आहेकंपनी यशस्वीपणे आपल्या मार्जिनमध्ये सुधारणा करेल कारण या निधीतून कर्जांची परतफेड करण्यात येईल.

 

या व्यवहाराने नाफामध्ये नव्याने इक्विटीची भर घालण्यात आली आहेकंपनीने नुकतेच नेटाफिम सिंगापूरकडून ९.४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे श्रेणी १ भांडवल उभे केले आहेतसेच सुरवातीचे गुंतवणूकदार आत्माराम प्रॉपर्टीज अँड ग्रॅनाइट हिल फंड यांच्या गुंतवणुकीची फरतफेड केली आहेफिनिक्स ग्रुप आणि कॉगिटो कॅपिटल यांनी नेटाफिम सिंगापूरमधील हिस्सा संपादित करून भारतातील आणि नाफामधील पहिली गुंतवणूक केली आहे.

 

आरबीआयकडून २०१३ साली एनबीएफसी लायसन्स संपादित करून नाफाने ८ राज्यांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहेनाफाने १०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना १००० पेक्षा जास्त कोटींची कर्जे वितरित केली आहेतया ग्राहकांपैकी ६०हून अधिक हे छोटे शेतकरी आहेतकंपनीची आता ग्राहकांच्या दीर्घकालीन वित्तसंबंधी गरजा पुरवण्यासाठी आपले नेटवर्क व विविध संबंधित क्षेत्रात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा आहे.

 

नेटाफिमचे सीएफओ लॉरी एहॅनोव्हर या संबंधी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “कोव्हिड परिस्थितीत भारत आत्मनिर्भर होऊ पाहत आहेभारताचा भर कृषी-ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्याच्या वेगाने होणाऱ्या आधुनिकीकरणावर आहेहे क्षेत्र अजूनही खूप असंगठित आहेऔपचारिक वित्त संस्थांकडून कृषी क्षेत्रातील कर्जाची मागणी पूर्ण होण्याचे प्रमाण खूप कमी असतेनेटाफिम ठिबक सिंचनाचे इनोव्हेटर आणि प्रिसिजन सिंचन पद्धतीत  जागतिक पातळीवर अग्रेसर आहेत आणि जगभरातील ग्राहकांना ५७ वर्षांहून अधिक काळापासून सेवा पुरवत आहेतनाफामध्ये इक्विटीची भर घातल्यामुळेशेतीमध्ये प्रिसिजन सिंचन आणि ऑटोमेशन सोल्युशन्स स्वीकारण्यासाठी ग्राहकांना मदत करण्याच्या आमच्या मूळ संकल्पनेशी सुसंगत आहेया  इक्विटी मुळे नाफाला त्यांच्या भांडवल पर्याप्ततेला बळकटी आणण्यासाठी आणि बाजारातील त्यांचे अस्तित्व विस्तारण्यासाठी मदत होईलभारतात आणि नाफामध्ये प्रथमच गुंतवणूक करण्यासाठी फिनिक्स ग्रुप आणि कॉगिटो कॅपिटलशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

 

कंपनीच्या योजनांबद्दल विस्तृत माहिती देताना नेटाफिम अॅग्रिकल्चरल फायनान्सिंग एजन्सी प्रालि.चे सीईओ प्रभात चतुर्वेदी म्हणाले, “भारतीय शेती सामान्यपणे अल्प आणि अनिश्चित उत्पन्न देणारे क्षेत्र समजले जाते कारण या क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचे आणि इतरही अनेक प्रकारचे धोके असतातत्यामुळे कृषी क्षेत्राला वित्त पुरविण्याची कायम गरज असतेविशेष व हवामान पूरक आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे दर्जेदार वित्त योजनांची मागणी अजून वाढली आहेविविध प्रकारची आर्थिक माध्यमे असूनही शेतकऱ्यांच्या खास गरजांची पूर्तता करणारी पुरेशी वित्तसहाय्य उत्पादने उपलब्ध नाहीतपरिणामीकर्जाची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहेविविध प्रकारच्या कर्ज योजनांची आवश्यकता आहेत्यासोबतच यासाठी पुरेसे मार्गदर्शनही गरजेचे आहेजेणेकरून भारतातील शेतकऱ्यांना कृषी व त्याच्याशी संलग्न क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवता येईल.

 

नाफा गेल्या दशकभरापासून या क्षेत्राला सेवा प्रदान करत आहेग्राहकांच्या गरजा समजून घेत आहे आणि त्यांना योग्य वित्त सहाय्य करत आहेया गुंतवणुकीने नाफा आपला कर्ज वितरण पोर्टफोलियो व सूक्ष्म-सिंचना बरोबर इतर कृषी-ग्रामीण क्षेत्रात विस्तार करेलआम्ही आमच्या प्रगती बाबत ठाम आहोततसेच कृषी व संलग्न क्षेत्रांच्या भांडवल गरजा पुरविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतया भांडवलामुळे आमचे बाजारात स्थान अधिक बळकट होईल आणि अधिक व्यापकतेने समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”

 

कॉगिटो कॅपिलचे व्यवस्थापकीय भागीदार गाय झुकिन म्हणाले, “नाफाला ग्रोथ कॅपिटल उपलब्ध करून देण्यासाठी नेटाफिम (सिंचन क्षेत्रातील पायोनियर व जागतिक पातळीवर आघाडीवर असलेलेआणि फिनिक्स इन्श्युरन्स (इस्राईलमधील एक आघाडीची विमा कंपनीयांच्याशी सहयोग करताना कॉजिटो अत्यंत उत्साही आहेतभारतीय कृषी एनबीएफसी बाजारपेठेत आमच्या भागीदारांसह नाफाच्या सातत्यपूर्ण प्रवासात त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोतही गुंतवणूक कॉजिटोच्याभक्कम भागीदारांसोबत गुंतवणूक करणेवेगवान प्रगती व समायोजित जोखीम संधी ह्या धोरणांशी सुसंगत आहे.”

 

फिनिक्स ग्रुपचे हेड ऑफ डायरेक्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्ट्मेन्ट्सओफर अविरन म्हणाले, “नाफा कंपनीत नेटाफिम आणि कॉजिटो यांच्यासोबत गुंतवणूक केल्याचा आम्हाला अभिमान आहेउदयोन्मुख बाजारपेठेत नेटाफिमचे असलेले ठळक अस्तित्व आणि कृषी पायाभूत विकास आणि खाद्य निर्मिती मधील व्यावसायिकता यामुळे सर्व संबंधितांच्या लाभासाठी सातत्यपूर्ण सहयोगासाठी एक महत्वाचे माध्यम आहेमी नेटाफिमच्या सीएफओ लॉरी हॅनोव्हर यांना धन्यवाद देतोत्यांच्या दूरदृष्टीशिवाय ही थोडीसी अवघड गुंतवणूक पूर्ण होणे शक्य नव्हते.”

 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight