अमायरा दस्तूर, गुरनजर चट्ठा आणि जैकी भगनानी यांच्या जेजस्ट म्यूजिकने या सीजनचे हार्टब्रेक सॉन्ग 'वाह जी वाह'च्या नव्या पोस्टरचे केले अनावरण!

बॉलीवुडच्या सर्वात चर्चित अभिनेत्रिंमधील एक, अमायरा दस्तूर आगामी गाण्यात पंजाबी पॉप स्टार, गुरनजर चट्ठासोबत जैकी भगनानी यांच्या जेजस्ट म्यूज़िक खाली बनलेल्या या सीजनचे हार्टब्रेक सॉन्ग 'वाह जी वाह' मध्ये दिसणार आहे.
सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन दरम्यान, अमायराने पोस्टर शेयर करताना लिहिले, "The secret is revealed ! @gurnazar_chattha and I can't wait for you to watch & hear #wahjiwaah ▶️ 23rd April 2021 💫"
आपल्या सोशल मीडियावर, जैकी भगनानी, गुरजनज़र चट्ठाने देखील याचे पोस्टर शेअर केले, ज्यात अमायरा आणि गुरनज़ार इंटेंस लुकमध्ये दाखवण्यात आले आहेत, ज्यात दोन प्रेमी एकमेकांपासून  तुटताना दिसत आहेत. ही एक परफेक्ट हार्टब्रेक मेलडी आहे.
पोस्टरमध्ये गाण्याच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत देखील खुलासा करण्यात आला असून हे गाणे 23 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
सुंदर अभिनेत्री आणि पंजाबी हिट गायिका, जैकी भगनानीच्या जेजस्ट म्यूज़िकसोबत 'वाह जी वाह' मध्ये दर्शकांचे मन जिंकण्यासाठी बिल्कुल तय्यार आहे.
सर्वात कमी वयाचा निर्माता, जैकी भगनानीच्या जेजस्ट म्यूजिक ने प्रादामध्ये आलिया भट्ट, जुगनी 2.0 मध्ये कनिका कपूर, शांतिप्रिय ट्रैक कृष्णा महामंत्र आणि 'मुस्कुराएगा इंडिया' जो एक परफेक्ट एंथम आहे, अशासारखी अनेक हिट गाणी दिली आहेत.
गुरनजर चट्ठाला 'कुड़ी कुड़ी', 'आदतां', 'काला टीका'सारख्या अनेक सुपरहिट ट्रैकसाठी ओळखण्यात येते. पंजाबी पॉपस्टार निश्चित रूपाने जेजस्ट म्यूजिकसोबत आपल्या आगामी ट्रैकवर दर्शकांना थिरकायला लावण्यासाठी सज्ज झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight