कोविड संकटात इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सद्वारे कर्मचारी मदत उपक्रम
या महामारीच्या काळात इंडिबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मदत करीत आहे.
कोविड काळात अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, खासकरून जेव्हा कुटुंबातील कमविता सदस्य गमावला असेल, तेव्हा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स यांनी या संकटात पुढाकार घेतला आहे. कंपनी ज्या कर्मचार्यानी कोविडमुळे जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबांना कंपनी 2 वर्षाचे वेतन देणार आहे व भारतात मुलांच्या शिक्षणाचा पदवीपर्यंतचा खर्च करणार आहे.
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्हाईस चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. गगन बंगा यांनी कंपनीच्या कर्मचार्यांना पाठविलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की,
“मी आपणा सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की, इंडियाबुल्स हाऊसिंग तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्याचा कोविडमुळे निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेत आम्ही आमच्या कर्मचार्यांचे मासिक वेतन त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांसाठी देत राहू व त्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे भारतातील शिक्षणाचा खर्चाची आम्ही काळजी घेवू. आम्ही आमच्या प्रिय सहकार्यांना परत आणू शकणार नाही, परंतु मला आशा आहे की ही आर्थिक मदत या दुर्दैवी घटनेत जिवन स्थिर करण्यासाठी, पुनर्स्थापित करण्यास आणि सामोरे जाण्यासाठी या कुटुंबाला आधार देईल.”
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सबद्दल
इंडियनबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (आयबीएचएफएल), राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (एनएचबी) द्वारा नियंत्रित, भारतातील तिसरी सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. क्रिसील आणि आयसीआरए यासह प्रमुख रेटिंग एजन्सीद्वारे कंपनीला ‘एए’ रेटींग दिलेली आहे.
आयबीएचएफएलने 1 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना समाधानकारक सेवा दिली असून, एकूण 2.77 ट्रिलियन एवढे कर्ज वितरीत केले आहे. कंपनीची देशभरात मजबूत उपस्थिती आहे आणि ‘ई-होम लोन’ हि ऑनलाइन गृह कर्ज प्रणाली भारतात सर्वप्रथम आणणारी कंपनी आहे.
Comments
Post a Comment