एचसीएलकडून कर्मचा-यांसाठीच्या कोव्हिड-१९ मदत उपक्रमांचा विस्तार
२५ मे २०२१: भारतामध्ये धडकलेल्या महामारीच्या दुस-या लाटेमुळे सामो-या आलेल्या आव्हानांतून मार्ग काढण्यासाठी आपल्या कर्मचा-यांना मदत करण्यासाठी एचसीएलने कोव्हिड-१९च्या परिणामांना आटोक्यात ठेवण्यासाठी सुरू केलेल्या आपल्या प्रयत्नांची व्याप्ती आणखी वाढवली आहे. आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या आरोग्य समस्येतून सुखरूप बाहेर पडता यावे यासाठी एचसीएलने सुरू केलेल्या या प्रयत्नांमध्ये कोव्हिड केअर सपोर्ट आणि अधिक सर्वसमावेशक अशा फॅमिली असिस्टन्स प्रोग्राम अशा दोन ढोबळ क्षेत्रांचा समावेश आहे.
एचसीएलच्या कोव्हिड केअर सपोर्ट उपक्रमामध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह झालेले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी मदत पुरवली जाते. यात कोव्हिड हेल्पलाइन्स व आयसोलेशनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासारख्या सेवांचा समावेश होतो.
- एचसीएल हेल्थकेअरची २४x७ चालणारी कोव्हिड केअर हेल्पलाइन कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टरांशी व लाइफ कोच सेवांशी सल्लामसलत करण्याच्या कामी मदत करत आहे, जेणेकरून कर्मचा-यांचे शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य जपले जावे.
- एचसीएलची हॉस्पिटल्सशी भागीदारी. कर्मचा-यांना उपचार आणि आयसोलेशनची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी एचसीएलने दिल्ली, नॉयडा, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, नागपूर, मदुराई आणि कोलकाता येथील हॉस्पिटल्सशी हातमिळवणी केली आहे.
- कोव्हिडची सौम्य लक्षणे असलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना घरच्याघरीच आपल्या आजाराचे व्यवस्थापन करता यावे यादृष्टीने त्यांना औषधांची होम डिलिव्हरी, घरच्या घरी वैद्यकीय सेवा, फूड डिलिव्हरी सेवा, आरटीपीसीआर आणि चाचणीची सुविधा, थर्मोमीटर्स आणि ऑक्सिमीटर्स अशा गोष्टी पुरविण्यासाठी काही संस्थांशी हातमिळवणी केली आहे.
- अधिक गंभीर रुग्णांसाठी अँब्युलन्स सेवा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून दिली जात आहे तसेच त्यांना महत्त्वाची औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी मदत केली जात आहे.
- एचसीएलने आपल्या कर्मचा-यांसाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी लसीकरण मोहिमा राबवणेही सुरू केले आहे २४ मार्च २०२१ पासून कंपनीच्या आवारांमध्ये तसेच भागीदार हॉस्पिटल्समध्ये या मोहिमा राबविण्यात येत आहेत.
कोव्हिडमुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांसाठी एचसीएलने सर्वंसमावेशक अशा फॅमिली असिस्टन्स प्रोग्राम सुरू केला आहे. यात पुढील बाबींचा समेश आहे:
- सहानुभूती तत्त्वावर मदत निधी: आपत्तीग्रस्त कुटुंबियांना तातडीच्या खर्चांचे व्यवस्थापन करण्यासाठी लगेच मदत मिळावी यासाठी ही एकगठ्ठा रक्कम जारी केली जाते.
- बाल शिक्षण आधार – मृत कर्मचा-यांच्या शालेय वयातील मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने (१ एप्रिल २०२० पासून लागू) ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- वैद्यकीय विम्याचे कवच: मृत कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या कुटुंब सदस्यांना आकस्मिक वैद्यकीय खर्चांचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी एचसीएल अशा सदस्यांसाठी वैद्यकीय विम्याच्या दोन किंवा अधिक पॉलिसी टर्म्ससाठीचा हप्ता भरेल.
- ग्रॅच्युटी: कर्मचा-याच्या कुटुंबियांना ग्रॅच्युटीची रक्कम देताना ही रक्कम मिळण्यास पात्र ठरण्यासाठी पाच वर्षांच्या सलग सेवेची असलेली अट शिथिल केली जाईल.
- रोजगाराची संधी: मृत कर्मचा-याच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी व त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे याची खातरजमा करण्यासाठी एचसीएलने अशा कर्मचा-याचा बेरोजगार जोडीदार किंवा त्यांच्यावर अवलंबून असेलल्या १८ वर्षांहून मोठया मुलांना त्यांच्या पात्रतेच्या आधारे, उपलब्ध जागांनुसार आणि प्रशिक्षण क्षमतेनुसार रोजगाराची संधी देऊ करण्याचा निर्णय एचसीएलने घेतला आहे.
आपल्या कर्मचा-यांना व त्यांच्या कुटुंबियांना महामारीचा सामना शक्य तितक्या परिणामकारकरित्या करता यावा यासाठी एचसीएलने अत्यंत काळजीपूर्वक या आधार योजनेची आखणी केली आहे. या योजनांअंतर्गत दिली जाणारी मदत अद्ययावत असावी व ती देशभरात हा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी लागू केलेल्या अनिवार्य नियमावलीबरहुकूम दिली जावी यासाठी या उपक्रमांचा सातत्याने फेरआढावा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Comments
Post a Comment