अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशन मार्फत, ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनला भेट
अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशन मार्फत, ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनला भेट
माननीय अमृता फडणवीस यांची दिव्यज फाउंडेशन ही एक अग्रगण्य प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था आहे, ज्याचा एकमेव उद्देश समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. फक्त एवढंच नाही तर दिव्यज फाऊंडेशन ज्ञान, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्य याद्वारे सक्षमीकरणाच्या त्यांच्या दृष्टीकोनानुसार विविध प्रकल्प हाती घेते. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, औषध, कार्य कौशल्य संच, आरोग्य आणि पोषण यांसारख्या मुख्य घटकांसाठी दिव्यज फाउंडेशन दरवेळेला नवं नवीन प्रकल्प राबवत असते.
ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशन कर्करोगावर उपचार घेत असणाऱ्या मुलांना आणि मुलांच्या पालकांसाठी किंवा त्यांची काळजी घेणाऱ्या काळजी वाहूंकांसाठी तात्पुरते परंतु हक्काचे असे घर प्रदान करते.शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीमती अमृता फडणवीस यांनी फाउंडेशनच्या सदस्यांसह ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनला भेट दिली, यावेळी त्यांनी तिथल्या मुलांसोबत आणि पालकांसोबत संवाद साधला. दरम्यान दिव्यज फाउंडेशन तर्फे सगळ्या मुलांसाठी भेटवस्तू सहित आर्थिक मदत सुद्धा केली. त्याचसोबत कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांच्या आयुष्यातील काही हसरे क्षण जोडण्यासाठी एक ११ वर्षाच्या लहान जादूगाराने सगळ्यांचे मनोरंजन सुद्धा केले. दिव्यज फाउंडेशन हे दरवेळेला समाजातील अनेक विषयांना महत्व देत त्यांच्या साठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामध्ये त्यांना अमृता फडणवीस यांची साथ आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत असते.
Comments
Post a Comment