निखळ प्रेमाची ओळख करून देणारा "काटा किर्रर्र" ..

निखळ प्रेमाची ओळख करून देणारा "काटा किर्रर्र" १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला...  

असं म्हणतात कि प्रेमाला जात, पात, वर्ग, कुळ असलं काहीच नसतं, प्रेम हि साधी निखळ भावना असते आणि ती भावना ज्याला कळते त्यालाच प्रेमाचा खरा अर्थ समजतो. अशाच एका सुंदर प्रेमाची गोष्ट घेऊन जितेंद्र वायकर दिग्दर्शित "काटा किर्रर्र" हा आगामी चित्रपट आपले मनोरंजन करायला सज्ज झाला आहे.  शिवम क्रिएशन प्रस्तुत "काटा किर्रर्र" हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम, करियर आणि त्यासाठी करावा लागणार संघर्ष या सगळ्यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटामध्ये आपल्याला नवोदित कलाकारांचा उत्तम असा अभिनय सुद्धा बघायला मिळणार आहे.
      प्रेम करण्यासाठी कधीच कसल्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते, आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात तिथे प्रेम कधीच होत नाही. या गंभीर अशा विषयावर जितेंद्र वाईकर यांनी आपल्या दिग्दर्शनाची बाजू चांगल्या पद्धतीने धरून ठेवली आहे. सतीश देवकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून सतीश देवकर स्वतः या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच बरोबर स्नेहा कुडवाडकर, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, विशाल चव्हाण आणि प्राजक्ता गायकवाड यांसारखे दमदार कलाकार सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचे दमदार असे, काटा किर्रर्र हे  गाणं सोशल मिडिया वर गाजत असून या तडफदार गाण्याला आनंद शिंदे यांनी आवाज दिला आहे. प्रेम आणि करियर या दोन विरुद्ध गोष्टींपैकी आपण कोणत्या गोष्टीला निवडायचं आणि या दोन गोष्टींचा विचार करताना आपण घेतलेला निर्णय हा कितपत योग्य ठरतो हे सार काही आपल्याला या  चित्रपटामधून बघायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..